Breaking News

सोन्याच्या भावात झळाळी मात्र कारागिरांचे आयुष्य काळवंडण्याची भीती !

लॉकडाउन मुळे सोन्याचा व्यावसायही अडचणीत
गौतम बचुटे । केज 
सोन्याचा भावात दिवेदिवस नवनवे उच्चांक होत आहेत सामान्य माणसाला आता सोने खरेदी हे आता फक्त स्वप्न ठरते की काय वाटत अस्तना लॉक डाउन मुळे सराफी व्यवसाय करणारे अडचणीत सापडले आहेत.

केज तालुक्यातील सराफी व्यवसाय करणारे लॉकडाउन मुळे अडचणीत आले आहेत. लग्नसराईच्या वेळी वधू-वरांना सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड असते. या हंगामात मोठी उलाढाल होत असते; परंतु या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार बंद असल्यामुळे सराफी व्यावसायिकांवर आर्थिक मंदीचे संकट आले आहे आणि हा व्यवसाय अडचणीत आला आहे.


सोने खरेदीसाठी सध्या ग्राहक दुकानात फिरकत नसल्याने आमची प्रचंड ओढाताण होत असल्याची प्रतिक्रिया स्वर्णकार
सचिन वेदपाठक यांनी व्यक्त केली.
               

No comments