Breaking News

मराठा विद्यार्थी -युवकांची विनाकारण आर्थीक अडवणूक करणारे झारीतील शुक्राचार्य कोण ...?- रमेश पोकळे

बीड : सारथी संस्थेच्या संदर्भात निर्माण केलेल्या  श्रेय वादामुळे मराठा समाजातील संशोधन करणारे विद्यार्थी व या संस्थेच्या आर्थिक सहकार्यातुन  MPSC व UPSC चा अभ्यास करणारे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी यांची माञ विनाकारण ससेहोलपट झाली प्रंचड मानसिक ञास सहन करावा लागत आहे....सारथी संस्थेला 8 कोटी रुपये दिल्याचे राष्ट्रवादी काॅग्रेस व शिवसेना  सत्ताधारी पक्षात श्रेयवाद सुरू झाला आहे...पण गेल्या 6 महिन्यापासून विनाकारण या संस्थेची व मराठा समाजातील गुणवान लाभकारक विद्यार्थी यांची अडवणूक करणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत... ? हे देखील मराठा समाजातील युवकांना विद्यार्थी यांना या निमित्ताने  लक्ष्यात आले असल्याचे अटल जनसेवक भाजपा नेते रमेश पोकळे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले आहे.

No comments