Breaking News

पिंपळनेर मध्ये रिपाइंचे निदर्शन

बीड : रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने व युवा प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली रिपाई पिंपळनेर सर्कलच्या वतीने राजगृह मुंबई येथे झालेला भ्याड हल्ला व वाढत्या दलित, बाैध्द अत्याचार विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना निवेदन  देण्यात आले. यावेळी रिपाइंचे तालुका ( उप )अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे, सर्कल अध्यक्ष सतिश शिनगारे,राजेभाऊ वक्ते, अशोक दळवी, राहुल कांबळे आदींची उपस्थिती होती.

No comments