Breaking News

केजमध्ये शिवसंग्रामचे दूध भाव वाढीसाठी अनोखे आंदोलन

अधिकाऱ्यांना दूधाच्या पिशव्या भेट देऊन कार्यकर्त्यांसह दुध उत्पादक शेतकऱ्यांनी केला संताप व्यक्त

गौतम बचुटे । केज 
 शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळावा आणि प्रती लिटर अनुदान देण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांना दुधाच्या पिशव्या देऊन आंदोलन करण्यात आले.

केज येथे दि.२० जुलै रोजी आ. विनायकराव मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाच्या वतीने केज तहसील कार्यालया समोर दूध दरवाढीच्या मागणीसाठी तालुकाध्यक्ष लिंबराज वाघ यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना मागण्यांच्या निवेदना सोबत दुधाच्या पिशव्या भेट देण्यात आल्या. निवेदनात दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या दराप्रमाणे प्रति लिटर २५ रु. भाव खाजगी दूध संकलन संस्था भाव देत नसून केवळ पंधरा ते सोळा रु. प्रति लिटर प्रमाणे कमी भाव देत असल्यामुळे सरकारने या शेतकऱ्यांना दहा रु. प्रति लिटर सरकारी अनुदान द्यावे. दुधाचे दर वाढवून शेतकरी आणि दुधत्पादक व पशुधन वाचवावे अशी मागणी केली आहे.
या वेळी नायब तहसीलदार आशा वाघ यांच्या केबिनमध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी त्यांना दुधाच्या पिशव्या दिल्या. या आंदोलनात तालुका अध्याक्षासह माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गलांडे, नामदेव गायकवाड, शिवाजी वाघमारे लिंबराज पंडीत विशाल नाईकवाडे आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No comments