Breaking News

वाटमारी प्रकरणातील तीन चोरट्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी

केज न्यायालयाचे आदेश

गौतम बचुटे । केज येथील कानडी रस्त्यावर एका दुचाकीस्वाराला तीन चोरट्यांनी अडवून त्याच्याकडील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम काढून घेतल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल होताच केज पोलिसांनी या घटनेचा छडा लावून आरोपींना तत्काळ ताब्यात घेतलं होतं. दरम्यान यातील आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने गुरुवारी (दि.९) दिले.

केज येथील इंटरनेट कॅफे चालक विजय राजाभाऊ कदम आपल्या दुचाकीवरून वडिलांसह बुधवारी रात्री कानडी रोडवरून जात असताना सोनारवाडी पुलाजवळ आरोपी निखिल उर्फ दादया राजाभाऊ मस्के, आकाश बापू लोंढे आणि विशाल उर्फ बबलू सुहास सरवदे या तिघांनाही त्यांना अडवून कदम यांच्या जवळील ओप्पो कंपनीचा एक मोबाईल, हातातील सोन्याची अंगठी, कानातील सोन्याची बाळी व खिशातील रोख पाच हजार रुपये असा एकूण ४४ हजार सातशे रूपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच केज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळ व त्यांचे सहकारी सपोउनि महादेव गुजर, मतीन शेख, अशोक नामदास, जिवन करवंदे, हनुमंत चादर, अशोक गवळी यांनी धडाकेबाज कार्यवाही करून निखिल उर्फ दादया राजाभाऊ मस्के आणि आकाश बापू लोंढे आणि विशाल उर्फ बबलू सुहास सरवदे या तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल कानातील सोन्याची बाळी, मोबाईल आणि मनी पर्स हस्तगत करण्यात आले असून गुरुवारी हे आरोपींना केज न्यायालयात हजर केले असता न्यातल्याने त्यांना पाच दिवसांची दि.१३ जुलै पर्यँय पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

 केज पोलिसांचे सर्वत्र कौतुक
पो नि प्रदीप त्रिभुवन, केज
Api संतोष मिसळे, केज
वाटमारी च्या गुन्ह्याचा काही तासात तपास करून आरोपींना जेरबंद करण्यात आल्याने केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रदिप त्रिभुवन यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे व त्यांच्या टीमचे केज मध्ये कौतुक केलं जात आहे.

No comments