Breaking News

जिल्हा परिषदेचे उपसभापती बजरंग सोनवणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी केला साजरा


 इन्फन्ट इंडियातील मुलांना शालेय साहित्यांसह खाऊचे केले वाटप; फुले नगरचे युवा कार्यकर्ते आकाश गायकवाड यांचा अनोखा उपक्रम
गौतम बचुटे ।  केज 
बीड जिल्हा परिषदेचे उपसभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या वाढदिवसा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

केज येथील युवा नेते आकाश गायकवाड यांच्या संकल्पनेतून सोनवणे यांचा वाढदिवस बीड तालुक्यातील पाली येथील इन्फंट इंडिया मधील एचआयव्ही बाधीत मुलांच्या हातांनी केक कापून साजरा करण्यात आला. तसेच यावेळी एचआयव्ही बाधीत मुलांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांना खाऊ वाटप करण्यात आला. याप्रसंगी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.  इन्फन्ट इंडियाचे संचालक दत्ता बारगजे व यांनी संध्याताई बारगजे यांच्या उपस्थितीत वृक्षा रोपणही करण्यात आले. यावेळी आकाश गायकवाड यांच्यासह पत्रकार गौतम बचुटे आदींची उपस्थिती होती.

No comments