Breaking News

राजगृहवरील हल्ल्याच्या निषेधार्थ यलगार


दिंद्रुड प्रतिनिधि 
दिंद्रुड येथे पोलीस ठाण्यावर महाविकास आघाडी सरकारचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मा. पप्पूजी कागदे साहेब युवक प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष 
यांच्या नेतृत्वाखाली यलगार निषेध व्यक्त करण्यात आला . 

महाविकास अघाडी सरकारच्या काळात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाचे नालायक, माते फिरूने तोडफोड केली आहे 
व दलित, बौद्धावर अन्याय अत्याचारात वाढ झालेली आहे व वाढ होत आहे. लॉकडाउंच्या काळात महाराष्ट्रात आनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाचे हल्ले खुन बलात्कार विनयभंग आदी स्वरूपाचे हल्ले झालेले आहेत. 
हल्लेखोरावर कडक कारवाई होत नसल्याने जातीवादाची फुत्कार होत आहे.हे सरकार दिन    दलित, बौद्धांना संरक्षण देण्यात अपयशी होताना दिसत आहे .
त्यामुळे दलित बौद्धांना संरक्षण देण्यासाठी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या नालायकाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठले ) दिंद्रुड शाखेच्या वतीने यलगार निषेध 
बाबासाहेब देशमाने,ता.उपाध्यक्ष माजलगाव , संदीपान डोंगरे ता.उपाध्यक्ष धारूर, भगवान देशमाने, किशोर धबाले,बाबा कांबळे ,किरण धुमाळ ,  राज पाईक ,  बाळू घडसिंग , विशाल देशमाने, अविनाश मोरे. ईत्यादी निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.

No comments