Breaking News

सारथी संदर्भात केलेल्या मराठा समाजबांधवांच्या बहुतांश मागण्यांना यश - आ विनायक मेटेस्वायत्तता टिकणार, ८ कोटींचा निधी मिळाला, स्पर्धा परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप येत्या ८ दिवसांत मिळणार 
उपमुख्यमंत्री अजित दादांनी बैठकीत आ मेटेंना दिला शब्द 
बीड : सारथी संस्थेची स्थापना हि मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, हितासाठी करण्यात आलेली आहे. हि संस्था मराठा समाजाच्या आंदोलनातून उभा राहिलेली आहे. यासाठी समाजाने असीम त्याग, परिश्रम घेतलेले आहेत. मात्र आपल्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून या संस्थेच्या कारभाराकडे दुर्लक्ष होत आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या नावाने अस्तित्वात आणलेल्या या संस्थेला वाढवायचे सोडून तिचे अधिकारच कपात करण्याचे धोरण काही महिन्यांपासून सुरु होते. या संस्थेची स्वायत्तता हिरावन्यासह विविध उपक्रम, योजना, शिष्यवृत्ती, कार्यालय आदी बाबी बंद करण्याकडेच येथील प्रशासनाचा कल दिसत होता. हि संस्था मराठा समाजाच्या संघर्षातून उभा राहिलेली आहे, समाजाच्या हितासाठी उभा राहिलेल्या या संस्थेला मराठा समाज बंद होऊ तर देणारच नाही शिवाय या संस्थेला उभारी मिळावी, व्याप्ती, उपक्रम वाढावेत यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करण्याची तयारी ठेऊन आहे. मराठा समाजामध्ये सारथीच्या बाबतीत होत असलेल्या गैरप्रकारांबाबत प्रचंड असंतोष निर्माण झाल्यांनतर याबाबत विविध ठिकाणी आंदोलने झाली. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बैठक घेतली. यामध्ये या सारथी संस्थेच्या प्रश्नाचा राज्याच्या विधीमंडळासह थेट दिल्लीपर्यंत पाठपुरावा करणारे शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे यांना उपमुख्यमंत्री अजित दादांनी बोलावले होते. या बैठकीत आ विनायक मेटे यांनी मराठा समाज व शिवसंग्रामच्या वतीने केलेल्या मागण्यांची पूर्तता अजित दादांकडून करण्यात आलेली असून यातील काही ह्या येत्या ८ दिवसांत करू असे त्यांनी आश्वासन दिले. 

   आ विनायक मेटे यांनी सारथी संस्थेच्या प्रश्नांबाबत यापूर्वीही बऱ्याच वेळा पाठपुरावा केलेला असल्याने त्यांनी याबाबत अभ्यासपूर्ण असे मागण्यांचे पत्रच या बैठकीत सादर केले. बैठकीच्या सुरुवातीलाच आ विनायक मेटे यांनी सारथीच्या संपूर्ण प्रश्नांबाबत उपस्थित मंत्रिगणांना माहिती दिली. हे प्रश्न सोडवले नाही तर पुन्हा मराठा समाज पेटून उठेल व तो दबाव सरकारच्या आवाक्याबाहेरचा असेल याची जाण आ विनायक मेटे यांनी सरकारला करून दिली. यावेळी आ विनायकराव मेटे यांनी पत्राद्वारे   १) सारथीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे या नावाने जी बदनामी होत आहे, यासाठी या भ्रष्टाचाराची चौकशीबाबत नेमलेल्या श्री निंबाळकर समिती व आताच्या श्री कुंटे यांच्या चौकशी समितीचा अहवाल ताबडतोब जाहीर करावा, यासोबतच जे काही या अहवालामध्ये आहे ते लोकांच्या समोर आणावे, कुणी याबाबत दोषी असेल तर कारवाई करावी अन्यथा सारथीला क्लीनचीट देऊन तत्काळ संस्थेचे काम सुरु करावे.  २) सारथी संस्थेअंतर्गत ज्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती सुरु आहेत त्या सगळ्या शिष्यवृत्ती सप्टेंबर २०१९ पासून थांबलेल्या आहेत, त्या सर्व ताबडतोब विनाविलंब त्या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात. यामध्ये युपीएससी, एमपीएससी, पीएचडी, एम फील, मुख्यमंत्री फेलोशिप यापैकी काही लोकांना गेल्या ८-९ महिन्यांपासून शिष्यवृत्ती नाही तर काहींना काहीच मिळालेली नाही. त्या सर्वांना शिष्यवृत्ती मिळायला हवी. ३) सारथी संस्थेची स्वायत्तता हि अत्यंत महत्वाची आहे. मंत्रिमंडळ मान्यतेने ४ जून २०१८ च्या शासन निर्णयान्वये सारथी संस्थेची स्थापना कंपनी कायद्याअन्वये स्वायत्त संस्था म्हणून केलेली आहे मात्र आतापर्यंत संस्थेस स्वायत्त असल्यासारखा कारभार करता आलेला नाही, तरी कंपनी कायद्यान्वये स्वायत्तता देण्यात यावी. ४) बार्टी व आदिवासी समाजाच्या विकासाकरिता स्थापित संस्थांप्रमाणे सारथीला देखील निधी मिळावा, आणि प्रत्येक वर्षी १ हजार कोटी किंवा प्रकल्प, उपक्रमास लागणारा खर्च, वेतन आणि वेतनेतर प्रकल्पासाठी लागणारा एकूण निधी हा प्राधान्याने दिला पाहिजे, व यामध्ये प्रत्येक वर्षी वाढ केली पाहिजे. जेणेकरून शासनाच्या मेहरबानीवर हि संस्था राहता कामा नये. ५) या संस्थेअंतर्गत ८० पेक्षा जास्त प्रकल्प सुरु करण्यात येणार होते मात्र यातील कित्येक प्रकल्प सुरु नाहीत. ते सर्व सुरु करावेत. ६) या संस्थेला कायमस्वरूपी व्यवस्थापकीय संचालक (एमडी) नेमणूक करण्यात यावी. सतत बदल्या करण्याचे सत्र थांबवावे. 
७) सारथी संस्थेअंतर्गत शैक्षणिक, नौकरी, संशोधन, स्पर्धा परीक्षा, व्यवसाय प्रशिक्षण, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आदींबाबत मराठा - कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्यात यावेत. ८) तारादूत प्रकल्प राबविण्यात यावा. 
९) सारथीचा सर्व हिशोब सारथीच्या वेबसाईटवर टाकण्यात यावा. १०)  संस्थेच्या कार्यालय व्यवस्थित सुरु नाही, कर्मचारी, अधिकारी नसतात, पूर्ण पदे भरली गेली नाहीत, कार्यालयात इंटरनेट सेवा नाही, वेबसाईट बंद आहे. हे सर्व सुव्यवस्थित करण्यात यावे. ११) राज्य व देशाबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरु करण्यात यावी व ज्यांना विविध विद्यापीठांतर्गत जाहीर झालेली आहे त्यांना ती द्यावी. या मागण्या आ विनायकराव मेटे यांच्याकडून करण्यात आल्या होत्या. 

या मागण्या झाल्या मान्य .... !
  या बैठकीत आ विनायक मेटे यांनी केलेल्या मागण्या तात्काळ मान्य करण्यात आल्या. यामध्ये संस्थेसाठी आवश्यक वेतन व वेतनेतर निधी आणि उपक्रमासांठी ८ कोटी रुपये तात्काळ निधी देण्यात आला. स्वायत्तता टिकवली जाणार, युपीएससी, एमपीएससी, पीएचडी, एम फील, मुख्यमंत्री फेलोशिप यापैकी काही लोकांना गेल्या ८-९ महिन्यांपासून शिष्यवृत्ती दिली गेली नव्हती तर काहींना काहीच मिळालेली नव्हती त्या सर्वांना येत्या ८ दिवसांत ती दिली जाणार आहे. सर्व सारथीचे उपक्रम सुरु करण्यात येणार आहेत. शिष्यवृत्ती धारकांना प्रोग्रेस रिपोर्ट देण्याची अट होती ती रद्द करण्यात आली आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे कारभार असणारी सारथी संस्था व मंत्री नवाब मलिक यांच्याकडील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आता नियोजन विभागाकडे म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित दादांकडे असणार आहे, सोबतच सारथी संस्थेसाठी व संस्थेच्या उपक्रमांसाठी, वेतन व वेतनेतर खर्चासाठी प्रत्येक वर्षी किती निधी या संस्थेला लागतो हे निश्चित करून त्याचा प्राधान्यक्रम ठरवून एकाचवेळी त्या पैशाची तरतूद करण्यात येणार, प्रत्येक २ ते ३ महिन्यांना एक बैठक होणार यामध्ये समाजाचे प्रतिनिधी व सरकार प्रतिनिधी असणार आहेत.  

No comments