Breaking News

मराठा आरक्षण टिकावे म्हणून एम आय एम चे शेख निजाम सुप्रीम कोर्टात......


मुस्लिम समाजाचे सुप्रीम कोर्टात देखील मराठा आरक्षणासाठी योगदान
दिल्ली (प्रतिनिधी)- संपूर्ण राज्यात मराठा क्रांती मोर्चा निघत असताना मुस्लिम समाजाने मोर्चेकरयांना पाणी, जेवण मोफत मध्ये वाटण्याचा कार्यक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जपली. आता मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकावे, मेडिकलला गरीब मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हावेत याकरिता बीडमधील एम आय एम चे शेख निजाम यांनी सर्वोच्च न्यायालयात अँड. स्नेहल शरद जाधव यांच्या मार्फत हस्तक्षेप याचिका दाखल केली असून यावरती लवकरच सुनावणी होणार आहे.

नुकत्याच झालेल्या एम. पी. एस. सी. परीक्षेत शेतकरी कुटुंबातील अनेक मराठा युवकांनी यश मिळविले. मोठ्या पदावर कष्टकरी मराठा समाजातील युवक आरक्षणामुळे बसू लागली आहेत. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यानंतर मेडिकलच्या प्रवेशावर स्थगिती यावी यासाठी काही याचिका मराठा आरक्षण विरोधात दाखल झाल्या आहेत. मराठा आरक्षण टिकावे, संघर्षातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे, त्याचा गरीब मराठा समाजाला फायदा व्हावा, मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरळीतपणे व्हावे याकरिता शेख निजाम यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.
मुस्लिम समाजातून मराठा आरक्षण टिकावे या करिता राज्यातील ही पहिलीच याचिका दाखल केल्यामुळे मराठा व मुस्लीम समाजाचे नाते नक्कीच घट्ट होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मोहिमेत मुस्लिम समाजाचे योगदान नक्कीच होते. शेख निजाम यांनी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची दाखल केलेली याचिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून सुप्रीम कोर्टातील सिनियर कौन्सिल च्या माध्यमातून ते आपली बाजू मांडणार आहेत. शेख निजाम यांच्या याचिकेमुळे मराठा समाजातून त्यांचे कौतुक केले जात असून यामुळे मराठा व मुस्लिम एकतेचा नवीन अध्याय नक्की सुरू होईल याची खात्री व्यक्त केली जात आहे.
मराठा समाजाचे मत घेणारे नेते कुठे गेले ? 
बीड जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मराठा समाजाच्या संघटना आहेत. समाजाच्या नावावर फक्त आजवर मत आणि पैसा गोळा करण्याचे काम झाले. मराठा आरक्षण न्यायालयात असताना जिल्ह्यातील एकाही नेत्याने अजुन न्यायालयात साधी उपस्थिती देखील लावलेली नाही. मराठा आरक्षण हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे, त्यासाठी रस्त्यावरच नाही तर न्यायालयात देखील भांडावे लागते हे या निमित्ताने तरी नेत्यांना कळावे.

निजाम यांचे सर्व स्तरातून कौतुक.
मराठा आरक्षणासाठी लाखो रुपये खर्च करून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून शेख निजाम यांनी मराठा - मुस्लिम एकतेचा नवीन अध्याय सुरू केला आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणारी वृती ही विकृत असून याविरुद्ध जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून लढले पाहिजे. हे फक्त बोलून नव्हे तर कृतीतून देखील निझाम यांच्या याचिकेमुळे दिसून आले आहे, म्हणून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मराठा आरक्षणाबाबत मुस्लिम समाजाने सकारात्मक भूमिका का घेऊन नेहमी मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून काम केले  शासनाने मुस्लिम समाजास शिक्षण व नोकरी मध्ये पाच टक्के आरक्षण देण्याची भूमिका मांडली होती परंतु अद्याप पर्यंत तसे काही झाले नाही मुस्लिम आरक्षणाबाबत शेख निजाम यांनी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत मागणी केली होती परंतु मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत महाराष्ट्र शासन कोणतीही हालचाल करताना दिसत नाही त्यामुळे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मोठी न्यायालयीन लढाई लवकरच सुरू करणार असल्याचे शेख निजाम यांनी म्हंटले आहे.

No comments