Breaking News

राजगृहाची तोडफोड करणार्‍या माथेफीरूवर कठोर कारवाई करण्यात यावी-पप्पु कागदेबीड : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह या निवासस्थानी तोडफोड करणार्‍या माथेफिरू समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यभर दलितांवरील हल्ले आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दलितांवर हल्ला करणार्‍या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशावरून युवा प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दि.11 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने आंदोलन करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती व वास्तूचा ठेवा असणारे मुंबईतील राजगुरू निवास्थान देशभरातील आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्थान असून या राजगृहावर तोडफोड करण्यात आलेल्या घटनेचा रिपाइंच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दलित व बौद्ध यांच्या वरील हल्ल्याची मालिका राज्यभर सुरू आहे.दलितांवरील हल्ले व अत्याचाराकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने राज्यभर अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार दलितांना न्याय देण्यामध्ये अपयशी ठरले आहे. आगामी काळात दलितांवरील हल्ले रोखण्यासाठी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणा स्थान असणार्‍या मुंबईतील राजगृह या निवासस्थानी दगडफेक करून तोडफोड करणार्‍या माथेफिरू समाज कंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपाइंच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी रिपाई युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्यासह मराठवाडा संघटक मझर खान जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड बीड तालुका अध्यक्ष किसन तांगडे, शहराध्यक्ष अविनाश जोगदंड, महेश आठवले, अमर विद्यागर, प्रा.बाळासाहेब गव्हाणे, सुभाष तांगडे, धम्मानंद पारवेकर, दयानंद उजगरे, महेंद्र वडमारे, प्रभाकर चांदणे, दीपक अरुण, भैय्यासाहेब मस्के, गौतम कांबळे, मिलिंद पोटभरे, विनोद सवई,सनी जोगदंड,भाऊसाहेब दळवी,अण्णासाहेब सोनवणे, चेतन चक्रे आदी उपस्थित होते.

No comments