Breaking News

प्रवासी महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करणारे दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात

केज पोलीसांची धडाकेबाज कार्यवाही : नागरिकांत पोलीसांचे कौतुक
गौतम बचुटे । केज 
वाहने बंद एका विवाहित तरुणीला तिच्या गावी सोडण्याच्या बहाण्याने मोटार सायकलवर बसवून तिला फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींचा केज पोलिसांनी छडा लावला असून त्यातील दोघांना ताब्यात घेतले असून अन्य एकाच्या मागावर पोलीस आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि. १३ रोजी एक २१ वर्षाची विवाहित तरुणी सायं. ७:३० वाजण्याच्या सुमारास बाहेरगावाहून आली. तिला कळंबला जायाचे होते. त्यामुळे ती केज बस स्टँडवर वाहनांची प्रतीक्षा करीत थांबली होती. मात्र लॉक डाउनमुळे कळंबला जाण्यासाठी एसटी किंवा इतर वाहन नसल्याने तिने एक ऑटो रिक्षावाल्याला कळंबला सोडण्यासाठी भाडे ठरविले. मात्र ती तरुणी एकटी व संकटात असल्याचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने त्या रिक्षाचालक तरुणाने तिचा विश्वास संपादन करून म्हणाला की, तीला ऑटो रिक्षा ऐवजी मोटार सायकल वरून कळंबला सोडतो म्हणून त्याने त्याच्या एका मित्रांसह त्या तरुणीला मोटारसायकलवर बसविले. परंतु गावाच्या बाहेर जाताच त्याने वाईट हेतूने तिच्या अंगाला स्पर्श करू लागला. हा त्यांचा वाईट हेतू जाणवताच तरुणीने त्यांना विरोध केला आणि गाडीवरून उतरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यानी तिला केज-कळंब महामार्गावरील साळेगाव बस स्टँडवर सोडून पळून गेले होते.

या प्रकरणी त्या तरुणीने दि.१४ जुलै रोजी केज पोलीस स्टेशनला हजर होऊन घडलेल्या प्रकारची रितसर लेखी तक्रार दिली होती. त्या नुसार अनोळखी इसमा विरुद्ध गु. र. नं. २६९/२०२० भा. दं. वि. ३५४ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रुक्मिणी पाचपिंडे यांनी अत्यंत खुबीने व यशस्वी तपास करून यातील दोन संशयित आरोपी ताब्यात घेतले आहेत. तर अन्य एकाचा तपास सुरू असल्याची विश्वासनिय माहिती सूत्रांकडून कळते.

" महिलांनी अशा वेळी कुठे अडकुन पडल्यास घाबरून जाऊ नये किंवा अनोळखी इसमावर विश्वास ठेवू नये. त्यांनी पोलिसांना कळविल्यास त्यांना सुरक्षित घरापर्यंत पोहचविले जाईल."
   
 प्रदीप त्रिभुवन, पो. नि. केज

No comments