Breaking News

राजगृहावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध..!

त्या माथेफिरूना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा; वंचितचे अजय सरवदे यांची मागणी
बीड : विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थावर केलेल्या भ्याड हल्याचा बीड जिल्हा वचितच्या वतीने याचा जाहीर निषेध करून त्या माथेफिरूला तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी वंचितचे अजय सरवदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे बुधवारी (दि.८) केली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुबंई मधील बाबासाहेबांचे राजगृह ही वास्तू देशातीलच नव्हे तर जगातील तमाम आंबेडकरी अनुयायांची अस्मिता आहे. बुधवारी पहाटे माथेफिरुने राजगृहात प्रवेश करून कुंड्यासह काचांची तोडफोड केली. यामुळं देशभरात भीमसैनिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून या भ्याड हल्याचा निषेध करण्यात येत आहे. त्या माथेफिरूला तत्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी व राजगृहाला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे वंचितचे अजय सरवदे यांच्यासह पदाधिकारी यांनी केली आहे.
आंबेडकरी जनतेनं संयम बाळगावा- सरवदे
राजगृहावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात येत असून हा बहुजन समाजाच्या अस्मितेवरील भ्याड हल्ला आहे. राज्य शासनाने या घटनेची चौकशी करून तत्काळ त्या माथेफिरूला गजाआड करून कठोर कारवाई करावी. तसेच तमाम आंबेडकरी जनतेनं संयम बाळगावा असं आवाहन वंचितचे अजय सरवदे यांनी केलं आहे.


No comments