Breaking News

विड्याच्या पशु वैद्यकीय इमारतीचे काम प्रगती पथावर

गौतम बचुटे । केज
तालुक्यातील विडा येथील पशु वैद्यकीय इमारतीचे बांधकाम प्रगती पथावर आहे.
पशुधन संवर्धन संवर्धन आणि पशुधन औषधोपचारासाठी तसेच पशुपालक आणि दुग्ध व्यावसायिक यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या नवीन इमारतीत प्रतीक्षागृह, कार्यालय, औषधी साठ्याचे स्टोअर रूम व शौचालय याचा समावेश आहे. सदर काम प्रगतीपथावर असून लेंटल लेव्हल पर्यंत हे काम आलेले आहे.

No comments