Breaking News

बीडमध्ये ८ जुलै ते १५ जुलै दरम्यान ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन

बीड : महाराष्ट्र शासन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड (Employment office, Beed)  यांचे वतीने दिनांक ८ जुलै ते १५ जुलै 2020 या कालावधीत ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे ( Online Job Fair)  आयोजन करण्यात आलेले आहे.

 सदर रोजगार मेळाव्याकरिता एकूण ८ उद्योजकांनी *विविध ४३१ पदे अधिसूचित केली आहेत. सदर पदांकरिता दहावी (पास-नापास), ITI, बारावी , MCVC, पदविका (Mech./IT/Computer/Nursing etc.) , पदवीधारक (Art's,/Commerce/Science/BBA/ Nursing etc.)तसेच पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात.अर्ज करण्यासाठी कृपया www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला ला आजच भेट द्या. काही अडचण आल्यास ०२४४२ २२२३४८ या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रा च्या वतीने करण्यात आले आहे.

No comments