Breaking News

ग्रामपंचायतीवर प्रशासक नको : वंचित बहुजन आघाडीची मागणी

 
बीड :  कोरोना रोगामुळे संपूर्ण महाराष्ट्रत व देशात लॉकडाउन चालु आहे याचा बहाना पुढे करून आघाडी सरकार ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला आहे व संपणार आहे अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या तयारी मध्ये आहे. त्यामुळे जवळच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या घशात ग्रामपंचायती देण्याचा डाव आहे, अशा स्वरूपाचे धोरण अवलंबिले आहे, या धोरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यपालांना निवेदन देऊन हा शासनाचा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठी बीड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना मार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासक नेमने हे घटनेच्या बाहय असून त्याला वंचित बहुजन आघाडीचा कडाडून विरोध आहे, प्रशासक नेमण्या ऐवजी ग्रामपंचायतीला सहा महिने मुदतवाढ देण्यात यावी किंवा निवडणुका घेण्यात यावी अशी मागणी  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अकरा हजार रुपये भरून कोणीही ग्रामपंचायतीचा प्रशासासक होऊ शकतो हे सर्व चुकीच्या पद्धतीने  अंमलबजावणी करण्याचे धोरण सत्ताधारी आघाडी सरकारने अवलंबिले आहे, भारतीय घटनेच्या दृष्टीने पाहिले तर ज्या प्रशासकीय व्यक्ती शपथ घेतली आहे अशाच व्यक्तीला प्रशासक नेमण्याचा अधिकार आहे मात्र कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रशासक म्हणून निवडण्याचा अधिकार नाही जर असे घडले तर हे घटनाबाह्य होऊ शकते. बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मुदतवाढ द्यावी अन्यथा निवडणुका घ्याव्यात पण प्रशासक नेमून या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी बीडचे विधानसभेचे उमेदवार  तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक हिंगे, बबन वडमारे, संतोष जोगदंड, बालाजी जगतकर, ज्ञानेश्वर कोठेकर अजय सरवदे, डॉ.गणेश खेमाडे, शेख युनूस, संदीप जाधव, लखन जोगदंड, विश्वनाथ शरणागत, पुष्पा तुरुकमाने बीड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

No comments