Breaking News

केजमध्ये गतिमंद युवकाची आत्महत्या

गौतम बचुटे । केज
एका गतिमंद युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केजमध्ये गुरुवारी (दि.दोन) उघडकीस आली.


मिळालेल्या माहितीनुसार, केज येथील किशोर शिवाजी शितोळे वय २९ वर्ष हा गतिमंद युवक दि. २, जुलै रोजी सकाळी ७:३० वा. च्या दरम्यान शौचास गेला तो लवकर परत न आल्यामुळे त्याचे वडील शिवाजी शितोळे यांनी त्याचा शोध घेतला असता शेतातील आंब्याच्या झाडाला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याची माहिती केज पोलीस स्टेशनला दिली पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर आणि पोलीस कॉन्स्टेबल मंगेश भोले हे घटनास्थळी हजर झाले. या प्रकरणी फौजदारी संहिता प्रक्रिया १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

No comments