Breaking News

सम्यक वाचा व शिल संपन्न व्यक्ती विजयी असतात - भिक्खु धम्मशील


बीड : मनातील चांगली गोष्ट इतरांना आवश्य कळवावी मात्र इतरांबद्दल  वाईट व अपप्रचार करणारी भाषा वापरु नये. केंव्हाही बोलताना अर्थपुर्ण भाषा वापरावी. सम्यक वाचा व शीलाचे पालन करणा·या व्यक्तींनी रागाची व द्वेशाची भाषा वापरु नये. त्यामुळे आपल्या प्रती असलेली आपुलकीची भावना इतरांमध्ये राहत नाही. आपल्या वाचेतून जे शब्द निघतात ते फुलांप्रमाणे असले पाहिजेत. नसता त्याचे वार शस्त्राप्रमाणे धारधार असतात. आपल्या वाचेतून वाईट शब्द, खोटे बोलने, इतरांची निंदा, अपप्रचार असे प्रकार घडू नये, असे न झाल्यास केवळ सम्यक वाचाच निर्माण होते. सत्यच बोलले जाते आणि सत्य केंव्हाही लपवता येत नाही. म्हणून सम्यक वाचा व शीलसंपन्न व्यक्ती विजयी असतात. असे मत पुज्य भिक्खु धम्मशील यांनी व्यक्त केले.

सम्यक संकल्प समता पर्व फेसबुक लाईव्ह प्रसंगी बुध्द धम्माचे मुलतत्व आर्य अष्ठांगीक मार्ग भाग -2, या विषयावर रविवार दिनांक 19-07-2020 रोजी सांय.7 वा.ते आपल्या वर्षावास कार्यकालातील धम्मदेसनेतून व्यक्त करत होते. यावेळी सम्यक संकल्प समता पर्व चे मुख्य संयोजक मा. प्रा. प्रदीप रोडे यांच्यासह संयोजन समिती व  बौध्द अनुयायी ऑनलाईन धम्मदेसनाचा लाभ घेत होते.
पुढे बोलताना पु. भिक्खु धम्मशिल म्हणाले की, ख·या शस्त्राचे घाव एकवेळ निघुन जातील पण शब्दांचे घाव कधी विसरत नाही ,वाणी ही शस्त्रांपेक्षा तिक्ष्ण आहे. शब्दांने आनंदी होता येते आणि शब्दच दु:खी ही बनवतात. शब्द मानवाचे मोठेपण निर्माण करतात तर शब्दच  मानवाच्या अवहेलनेचे कारण बनतात. म्हणून भगवान बुध्द म्हणतात मानवाने आपुलकीने वागावे, जिव्हाळा निर्माण करावा व इतरांवर प्रेमाचा वर्षाव करावा.आपण जे जगतो, वागतो तसेच समाजही आपल्या सोबत अनुकरण करत असतो. इतरांचा सन्मान करा, इतर ही आपणाला सन्मानाने स्विकारतील चांगल्या कर्माचे फळ मधुर असतात तर कुकर्माचे परिणाम केंव्हाही वाईटच असतात. खोटे बोलणारा व्यक्ती भयभित असतो तर सत्य बोलणारा कोणालाही घाबरत नाही. आपल्या हातून वेगवेगळ्या दानाचे कुशलकर्म होणे  महत्वाचे आहे. आपल्या बुध्दीचा उपयोग करुन आपल्या हातून प्रत्येक कार्य शिलसंपन्न करणे म्हणजे कुशाल कर्म असते आणि त्यातूनच सुखाची प्राप्ती होते. मध्यपान, शस्त्रव्यवसाय अशा प्रकारचे इतर ही व्यवसाय करु नये, कारण त्या व्यवसायाचे अणुकरण करणा·या इतकेच व्यवसाय करणारे ही गुन्हेगार असतात. तेव्हा प्रत्येकाने सम्यक अजिवी म्हणजे चांगले जिवन जगण्याचा मार्ग स्विकारावा, व तशा तत्वाचे पालनकर्ते कधीही दु:खी होत नाहीत. त्यांच्या मार्गावर केंव्हाही सुखप्राप्ती असते.
यावेळी ऑनलाईन धम्मदेसना प्रक्षेपणासाठी प्रा. कोरडे अंकुश, प्रा. पांचाळ बबन, प्रा. वाघामारे किशोर यांनी सहकार्य केले.

No comments