Breaking News

वैष्णवीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत सावता परिषदेचा लढा सुरू राहील- कल्याण आखाडे

मयत वैष्णवी गोरेच्या कुटुंबियांची कल्याण आखाडे यांनी घेतली भेट

बीड :  सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी मयत वैष्णवी गोरेच्या कुटुंबियांची मंठा जि.जालना येथे जाऊन भेट घेतली व त्यांचे सांत्वन करून धीर देताना मारेकऱ्यास फाशीची शिक्षा होईपर्यंत सावता परिषदेचा लढा सुरू राहील अशी ग्वाही दिली.

               
 वैष्णवी गोरे हिच्या निर्घृण हत्येची माहिती समजताच या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी पुढाकार घेत आवाज उठविला.
खुनी शेख अल्ताफ या माथेफिरूस फाशीची सजा झाली पाहिजे यासाठी हा खुन खटला जलदगती न्यायालयात चालवावा व सरकारी वकील म्हणून ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करून खटला अंडर ट्रायल चालवा ही मागणी कल्याण आखाडे यांनी शासन दरबारी लावून धरली. त्यानंतर काल त्यांनी मंठा येथे जाऊन पीडित गोरे कुटुंबीयांची समक्ष भेट घेतली. तसेच पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करून मंठा वकील संघाला आरोपीचे वकीलपत्र कोणीही स्वीकारू नये असे निवेदनही त्यांनी दिले.

               यावेळी त्यांच्यासोबत परतूर पं.स.उपसभापती रामप्रसाद थोरात, घनसांगवी पं.स. सदस्य तथा सावता परिषदेचे प्रदेश संघटक भास्कर गाढवे, सेलूचे माजी नगराध्यक्ष तुकाराम गायकवाड, सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते प्रा.डॉ.राजीव काळे, विभागीय उपाध्यक्ष पंडित महाराज रासवे, जालना जिल्हाध्यक्ष अजित बुलबुले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तथा जालना पं.स. सदस्य सुषमा खरात, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप मगर, परमेश्वर ढवळे, राम कोरडे, सौ मंगल खांडेभराड, जनार्दन बारवकर, सुभाष गिराम, शरद कोरडे, दिनकर नाईकनवरे, राम गिराम, महादेव जावळे, अशोक खरात, महादेव हजारे, महादेव उखांडे, शिवाजी हजारे, शरद कोरडे, दिनकर नाईकनवरे, राम गिराम, प्रभाकर जवळकर, सचिन मगर, गणेश गिराम, आदी जण उपस्थित होते.

No comments