Breaking News

आ. संदीप क्षिरसागरच खरे हिरो : कमलताई निंबाळकर

समाजात लायकी नसणारे 
'नायक' कसे ते खलनायकच !
बीड : मराठा आरक्षणामध्ये ज्यांनी शेण खाल्ले, समाजाला वेठीस धरले, मराठा समाजाची दिशाभूल केली, आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरून कडवी झुंज देत असताना आरक्षणाच्या आंदोलनातून त्यांनी माघार घेतली आणि पाय लावून पळून गेले अशा भामट्यांनी आमदार संदीप क्षिरसागरांसारख्या जनतेच्या रियल हिरोवर शिंतोडे उडू नयेत, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कमलताई निंबाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.


प्रसिद्धी पत्रकात पुढे कमलताई  निंबाळकर यांनी आमदार संदीप क्षिरसागर यांच्यावर आरोप करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. पुढे त्या म्हणाल्या की, समाजामध्येच नव्हे तर आम जनतेमध्ये देखील ज्यांची काहीच किंमत नाही, अशा ना-लायक लोकांनी आपली लायकी ओळखून इतरांवर आरोप करावेत. बीड विधानसभेची आमदारकी तर फार दूर दूरची गोष्ट आहे. स्वतःच्या गावाची ग्रामपंचायत ताब्यात घेताना ज्यांचे नाकीनऊ येतात आणि निसटता विजय मिळतो अशांनी आमदारकीची स्वप्ने कधीच पाहू नयेत. जनतेमध्ये पत नसणाऱ्या लोकांनी आमदारकीचे स्वप्न पाहणे म्हणजे शेखचिल्ली सारखेच म्हणावे लागेल. मराठा आरक्षणाच्या वेळी अक्षरशः मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणारे मराठा समाजाचे नेते कधीच होऊ शकत नाहीत. एकूणच नाक कापले तरी छिद्र आहेत असे म्हणणाऱ्यांनी संदीप क्षिरसागर यांच्यावर आरोप करू नयेत. आमदारकीची खुमखुमी असणाऱ्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेमधून निवडणूक लढवून दाखवावी. तेव्हा कळेल जनतेमध्ये आपली पत आणि किंमत किती आहे. यापुढे बीड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संदीप क्षिरसागर यांच्यावर
 कोणी आरोप केले तर त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. असा आस सज्जड दम शेवटी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा कमलताई निंबाळकर यांनी दिला आहे.

No comments