Breaking News

केजमध्ये राजगृहा वरील हल्ल्याचा विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीने निषेध


गौतम बचुटे । केज :
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृहावर झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा केज येथे विविध पक्ष आणि संघटनांनी तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांना निवेदने देऊन तीव्र निषेध नोंदविला आहे.


 रिपब्लिकन सेनेचे प्रा. बळीराम सोनवणे, अरुण बनसोडे, सय्यद रजाक, गोपीनाथ इनकर बाबा अहिरे, सोनवणे प्रकाश, उत्तम लोंढे, अश्रुबा तुपारे, शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड, अशोक रोडे, मंगेश देशमुख तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी तालुकाध्यक्ष प्रवीण कुमार शेप केज तालुका अध्यक्ष बिपिनचंद्र ठोंबरे, माजी नगराध्यक्ष पशुपतिनाथ दांगट, माजी नगराध्यक्ष कबीर इनामदार, माजी उपनगराध्यक्ष दलित इनामदार, प्राचार्य लक्ष्मण डोईफोडे सर, युवक तालुकाध्यक्ष अंगद गुंड, अमर पाटील, समीर देशपांडे, दिनकर राऊत, कपिल मस्के, लक्ष्मण जाधव, नितीन सत्‍वधर प्रेम गायकवाड, बाळू कुरुंद. 

त्याच प्रमाणे  त्याच बरोबर वंचित आघाडीच्या वतीने बाबासाहेब विठ्ठल मस्के, बाबा मस्के, बाबा पोटभरे, उत्तम अप्पा वाघमारे, भाऊसाहेब पाचपिंडे, रंजित घाडगे, विशाल धिरे, अजय भांगे त्याच प्रमाणे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनचे योगेशभाई गायकवाड, अझरभाई इनामदार, अमोल सत्वधर, समाधान हजारे, करण मस्के, सद्दाम शेख, भोलानाथ पौळ, सतिष कसबे, धिरज कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 निवेदनात या भ्याड हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करून हल्लेखोरस ताब्यात घेऊन कठोर कार्यवाहीची मागणी केली आहे.

No comments