Breaking News

दुचाकीस्वार लूट प्रकण: अवघ्या ३ तासात केज पोलिसांनी चोराच्या मुसक्या आवळल्या, तालुकाभर पोलिसांच्या कामगिरीचे केलं जातंय कौतुक

गौतम बचुटे । केज
केज येथे कानडी रोडवर रात्रीच्या वेळी एका इंटरनेट कॅफे चालकाची मोटार सायकल अडवून त्याचा मोबाईल, अंगठी, कानातील बाळी व जवळील रोख रक्कम काढून घेतल्याची घटना घडली. पोलीसानी गुुन्हा दाखल होताच यातील दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून तिसऱ्याच्या मागावर आहेत.

केज येथे दि. ७ जुलै रोजी हे इंटरनेट कॅफे चालक रात्री१०:३० ते ११:०० दरम्यान विजय राजाभाऊ कदम व त्यांचे वडील हे मोटार सायकल वरून कानडी रोडने जात असताना ते सोनारवाडी पुलाजवळ आले असता; निखिल मस्के त्याचा बबलू नावाचा एक साथीदार व अन्य अनोखी एकजण अशा तिघांनी त्यांना अडवून त्याच्या जवळील ओप्पो कंपनीचा एक मोबाईल, हातातील सोन्याची अंगठी, कानातील सोन्याची बाळी व खिशातील रोख पाच हजार रु. असा एकूण चौरेचाळीस हजार सातशे रु किंमतीचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी विजय राजाभाऊ कदम यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला निखिल मस्के, बबलू व अन्य एक अनोळखी यांच्या विरोधात गु. र. नं. २६४/२०२० भा. दं. वि. ३९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच अवघ्या तीन तासाच्या आत तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि त्यांच्या सहकार्यांनी धडाकेबाज कार्यवाही करून निखिल उर्फ दादया राजाभाऊ मस्के आणि आकाश बापू  लोंढे यां दोघांना ताब्यात घेतले असून तिसरा आरोपी बबलू याच्या मागावर पोलीस आहेत.पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास  तपासी पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे करीत आहेेेत.
दरम्यान या रोडवर अनेक वेळा असे प्रकार घडलेले आहेत.

अवघ्या तीन तासात चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यामुळे केज पोलिसांचे कौतुक होत असून गुन्हेगारांवर दहशत निर्माण झाली आहे

No comments