Breaking News

बांध खोदून अडवला रस्ता: मंडळ अधिकारी यांनी केला स्पॉट पंचनामा

गौतम बचुटे । केज
तालुक्यातील साळेगाव शिवारात शेत रस्ता खोदून रस्ता अडविल्या प्रकरणी  शेतकऱ्यांनी निवेदनाची तहसीलदारांनी दखल घेत मंडळ अधिकाऱ्या मार्फत पहाणी करून पंचनामा करून अहवाल सादर केला आहे.

या बाबतची माहिती अशी की, साळेगाव ता. केज शिवारातील गट नं./ सर्व्हे नं. २९ व २७ मधील बांधावरून जाणार जुना व पूर्वपार रस्ता हा शेता लगतचे शेजारी शेतकरी एच. पी. देशमुख यांनी जेसीबी मशिनने रस्ता खोदून नंबर बांधाच्या मधोमध पाईपलाईन करून रस्ता बंद केला आहे. त्यामुळे रस्ता बंद केला म्हणून येथील शेतकरी सिमा मोहन धपाटे, शेख अतिक हमीद आणि प्रदीप मोहनराव कोठुळे यांनी दि. ८ जुलै रोजी तहसीलदार केज यांना निवेदन दिले होते.

त्या नुसार केजचे तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी निवेदनाची दखल घेत दि. १४ जुलै रोजी एका आदेशद्वारे मंडळ अधिकारी दळवे आणि बाळासाहेब फरके यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पहाणी करून पंचनामा केला. त्याचा अहवाल महसूल विभागाच्या सादर केला आहे.

No comments