Breaking News

जिल्ह्यातील कंटेनमेंट व बफर झोन वगळून सकाळी ९ ते ७ वाजेपर्यंत मद्यविक्रीस परवानगी

बीड, :-  बीड जिल्ह्यातील केटेनमेंट झोन व बफर झोन वगळून इतर क्षेत्रातील किरकोळ मद्य विक्री वाईन शॉप, परमिट रुम, बीअर शॉपी, व देशी दारु किरकोळ विक्री दुकाने अनुज्ञप्त्यांमधून सकाळी ९.०० वाजेपासून सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत सीलबंद बाटलीतून मद्याची विक्री करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. तसेच परमिटरूम परवानाकक्ष अनुज्ञप्तींना एफएल-१ घटकांकडून नविन मद्य साठा घेण्यास व लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत त्यांना सीलबंद बाटलीतून मद्य विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.आणि शासन अधिसूचनेनुसार नमुना एफएल-III परवानाकक्ष अनुज्ञप्तींना नविन मद्य साठा घेण्यासव लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत त्यांना सीलबंद बाटलीतून मद्य विक्री करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे.
मद्याची सीलबंद बाटलीत विक्री करतांना कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाने विहित केलेल्या सूचनांचे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने विहित केलेल्या सर्व मार्गदर्शकतत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अनुज्ञप्तीधारकाची राहील. मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ च्या कलम ५१ ते ६० अन्वये तसेच भारतीय दंडसंहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल होण्यास पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्र दारुबंदी कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईस पात्र असतील. सदर आदेशाचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती तात्काळ रद्द करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी यांनी सुचित केले आहे.

No comments