Breaking News

साळेगाव जवळ आणखी एक वाटमारीची घटना

चाकुचा धाक दाखवून दुचाकीस्वाराकडून अज्ञात चोरट्याने लुटले 

गौतम बचुटे । केज
तालुक्यातील साळेगाव जवळील महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडील २७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी घेवून पळ काढला. लॉकडाऊन मध्ये वाटमरीच्या घटनेत वाढ होऊ लागल्याने दुचाकीस्वारात दहशतीचे वातावरण पसरले असून वाटमारीच्या घटनेला रोखण्याचं युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलंय.

मिळालेल्या माहितीनुसार केज-कळंब महामार्गावरील साळेगावच्या ३३ केव्ही वीज वितरण उपकेंद्रा जवळील दर्ग्या जवळ अशोक चंद्रकांत कुपकर आणि गणेश शाहूराव कुपकर हे दोघे मोटार सायकलवरून सुर्डी (सोनेसांगवी) कडे जात असताना रात्री ९:१५ ते ९:३० वा.च्या दरम्यान त्यांना अज्ञात चौघांनी अडवून त्यांच्या जवळील मोबाईल आणि रोख रक्कम असे मिळून सुमारे सुमारे २७ हजार ४५० रु. चा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी अशोक कुपकर यांच्या फिर्यादी नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. १४०/२०२० भा. दं. वि. ३९२ व ३४ नुसार युसूफवडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे आणि आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश कोरडे हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान अशाच एका घटनेचा केज पोलिसांना छडा लावण्यास यश मिळालं असताना लॉकडाऊन मध्ये वाटमारीचे प्रकार घडू लागल्याने केज तालुक्यात दुचाकीस्वारांमध्ये दहशत पसरली असून केज पोलिसांसमोर या वाटमारीला रोखण्याचे आव्हान उभं ठाकल आहे.

No comments