Breaking News

सेवानिवृत्त शिक्षक पित्याला मुलाने धडा शिकवला

गौतम बचुटे ।  केज
आईशी थोड्या थोड्या व किरकोळ कारणावरुन भांडण करणाऱ्या एका सेवानिवृत्त शिक्षकास त्याच्या मुलाने हेल्मेटने आणि काठीने मारहाण करून उजवा हात फ्रॅक्चर केला आहे.


या बाबतची माहिती अशी की, केज येथील समर्थ भागात सेवानिवृत्त शिक्षक नामदेव जाधव हे त्यांची सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पत्नी आणि कुटुंबासह राहतात. सेवानिवृत्त शिक्षक नामदेव जाधव यांचे त्यांच्या पत्नीशी किरकोळ कारणावरुन घरात बाचाबाची होऊन भांडण झाले. याचा राग त्यांच्या मुलास आला. त्याने किरकोळ कारणावरुन आईशी का भांडण केले? असे म्हणून वडील नामदेव जाधव यांना त्यांच्या घरी दि. ८ जुलै रोजी सकाळी ९:०० च्या दरम्यान हेल्मेटने डोक्यात व पाठीत मारहाण केली. तसेच घरातील काठीने उजव्या हाताच्या कोपरावर मारहाण करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. यात नामदेव जाधव यांच्या उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. नामदेव जाधव यांनी केज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून त्यांची पत्नी सौ. कस्तुरभाई नामदेव जाधव व मुलगा मुकुंद नामदेव जाधव यांच्या विरोधात गु. र. नं. २६३/२०२० भा. दं. वि. ३२५, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान एका मुलानेच आपल्या सेवा निवृत्त शिक्षक बापाला मारहाण केल्याची चर्चा होत असून यात दोषी कोण? हे तापअंसती स्पष्ट होईल.

No comments