शिवसंग्रामचे शेतकऱ्यांसाठी कापसाच्या शेतात निदर्शने
कापूस पीक विमा तात्काळ जमा करावा :-राजेंद्र आमट
बीड : कोरोनाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्न कडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करत आहे वारंवार पाठपुरावा करूनही संपूर्ण बीड तालुका दळभद्री अधिकायच्या कारभारामुळे कापूस पीक विम्यापासून वगळण्यात आला आहे मागील वर्षी अतिवष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस पावसामुळे गळाला होता बॉंड झाडावरच अक्षरशः सडून गेली होती शेतकऱ्यांना कापूस उत्पादक ही तुटपुंजे झाले होते शेतकऱ्यांना पिकविम्याची मदत मिळेल ही अपेक्षा आहे
परंतु दळभद्री अधिकारी मिळे बीड तालुका पिकविम्यातुन ओघळण्यात आला शासनाने त्वरित शेतकऱ्यांना कापूस व तूर पिकाच्या विमा देण्यात यावा या मागणी करीता कोरोनाच्या धर्तीवर सोसिल डिस्टन्स पळून शेतात सरकार व प्रशासनाचा घोषणा बाजी करून जाहीर निषेध करण्यात आला जर शासन व प्रशासन त्वरित कार्यवाही करून बीड तालुक्यासह जिल्ह्यातील वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांना कापूस व तुरीचा पीक विमा जमा न केल्यास मा.आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर प्रशासनच्या विरोधात अतिशय तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे राजेंद्र आमटे यांच्या वतीने देण्यात येत आहे
या वेळी कापसाचा पीकविमा न मिळाल्याच्या निषेधार्ह कापसाच्या शेतात सोसिल डिस्टन्स पळून निषेध करण्यात आला या वेळी शिवसंग्राम विध्यार्थी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,विश्वभर सपकाळ,श्यामसुंदर आमटे,मसुराम सोळुंके, उद्धव सोळुंके,अर्जुन सपकाळ,विशाल सोळुंके,नानासाहेब आमटे,ज्ञानेश्वर अंतर,विकास सपकाळ,किशोर आमटे आदींच्या वतीने निदर्शने करण्यात आले.
No comments