शौचास गेलेल्या विवाहितेचा विनयभंग
गौतम बचुटे । केज
पोलीस स्टेशनला तक्रार दिली म्हणून केज तालुक्यातील शिरपुरा येथे रात्रीच्या वेळी शौचास जाणाऱ्या एका सत्तावीस वर्षीय विविहित महिलेचा वाईट हेतूने हात धरून तिचा विनयभंग करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व जवळचे दोन हजार रु. चोरून नेल्याचे घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील शिरपुरा येथे दि. ६ जुलै रोजी रात्री ८:०० वा च्या सुमारास सत्तावीस वर्षीय विवाहीत महिला ही शौचास जात असताना उत्तरेश्वर विष्णु घुले हा तिच्या मागे गेला. विवाहितेला म्हणाला की तुम्ही आमचे विरूद्ध पोलीस स्टेशनला फिर्याद का दिली ? असे म्हणुन शिवीगाळ केली. त्याने ओळखीचा गैरफायदा घेवुन वाईट हेतुने धरून ओढून विनयभंग केला. तसेच तिच्या गळ्यातील चार ग्रॅमचे मणी मंगळसूत्र काढून घेतले आणि तिच्या जवळील लेडीज पाकीट मधले दोन हजार रूपये काढून घेतले. तसेच धनराज नारायण घुले, विष्णु प्रभु घुले व नारायण प्रभु घुले सर्व रा. शिरपुरा ता. केज हे आले. त्यांनी पण शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली. या प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून केज पोलीस स्टेशनला उत्तरेश्वर विष्णू घुले व इतर तीन लोकां विरुद्ध गु. र. नं.२६१/२०२०; भा. दं. वि. ३५४, ३२७, ३२३, ५०४ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिनकर पुरी हे पुढील तपास करीत आहेत.
No comments