Breaking News

वीज कंपनीच्या कार्यालयासमोर सोमवारी बिलाची होळी करून हालगी बजाओ आंदोलन - रमेश पोकळे

बीड जिल्ह्यात वीज कंपनीने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले दिली
 


बीड :  महावितरण वीज कंपनीने गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण व शहरी वीज ग्राहकांना मिटर रेडिंग न घेता अवाजवी वीज बील आकारणी करून मनमानी सुरू केली आहे. वीज कंपनी ग्राहकांना मानसिक आणि आर्थिक त्रास देत असल्याने ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवार  दि.20 जुलै 2020 रोजी बीड येथे महावितरणचे अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर शासनाला व प्रशासनाला जागे करण्यासाठी हालगी बजाओ आंदोलन करून वीज बिलाची होळी करणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश कार्यसमिती सदस्य रमेश पोकळे यांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यात लॉकडाऊन आणि कोरोनामुळे
नागरिक, व्यापारी , शेतकरी आर्थिक अडचणीत संकटात सापडले आहेत. मात्र अशाही परिस्थितीत वीज कंपनी ग्राहकांना अवाजवी वीज बिल देवून ग्राहकांची कोंडी करू पाहत आहे. ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी , छोटे  व्यावसायिक , सर्व सामान्य ग्राहकांना मिटरची रेडिंग न घेताच अवाजवी आणि अव्वाच्या सव्वा वीज बील आकारणी केली आहे. या संदर्भात भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा खा.डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपा नेते रमेश पोकळे यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची शुक्रवारी ऑनलाईन बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये वीज बील माफी,  ग्रामीण व शहरी भागातील नादुरुस्त झालेले विद्युत ट्रान्सफार्मर तातडीने दुरूस्त करणे,  दोन शेतकरी एक डिपी या  योजनेतून लाभधारक शेतकऱ्यांच्या शेतात तातडीने वीज जोडणी करणे यासह ग्राहकांच्या ईतर  प्रश्नावर महावितरण कंपनीच्या विरोधात कोरोना संसर्ग विषयक उपाययोजनांच्या नियमावलींचे पालन करून सोमवार दि.20 जुलै रोजी सकाळी 11 वा. जालना रोड  बीड येथील  महावितरणचे अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर हालगी बजाओ आंदोलन व वीज बिलाची होळी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांनी कोरोना संसर्ग संदर्भात जाहिर केलेल्या नियमावलीचे पालन करूनच सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी दि. 20 जूलै रोजी सोमवारी सकाळी 11 वा.वीज कंपनी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे प्रदेश कार्यसमिती सदस्य रमेश पोकळे यांनी केले आहे. 

दरम्यान ऑनलाईन बैठकीत खा. डाॅ प्रितमताई मुंडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना  सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सुभाष धस, भाजपा युवा नेते रोहित देशमुख, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्निलभैय्या गलधर, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सलिम जहाँगीर  ,भाजपा नेते बबनराव सोंळके;  भाजपाचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख प्रा.डाॅ देवीदास नागरगोजे, भाजपा भटक्या विमुक्त आघाजीचे जिल्हाध्यक्ष भुषण पवार , दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय घोळवे, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डाॅ. अभय वनवे,  शिवबा संघटनेचे जिल्हाध्यक्ष हानुमंत मुळिक, आध्यात्मिक आघाडीचे सहसंयोजक तुळशीदास शिंदे महाराज, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव केदार , भाजपा नेते सुरेश उगलमोगले, वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रविण देशपांडे , सुधाकर पौळ , प्रा. डाॅ. बिभिषन फड , भरत खरमाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

No comments