Breaking News

भगवानराव सांगळे मामा यांचे निधन

बीड :  बॅटरी व्यवसायात नावलौकिक मिळविलेले भगवानराव जिजा सांगळे (मामा) यांचे शुक्रवार दिनांक 17 जुलै 2020 रोजी सकाळी 7.30 वाजता दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 60 वर्षे होते.
सांगळे मामा यांनी जालना रोडवर गेल्या 35 वर्षापूर्वी महाविर भगवान बॅटरीचे दुकान सुरु करून व्यवसायास प्रारंभ केला. प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाशी आणि मेहतीमुळे बॅटरी, युन्हर्टरमध्ये त्यांचा नावलौकिक झाला. एक्साईज बॅटरी कंपनीच्यवा वतीने राज्यातील सुप्रसिध्द डिलर म्हणून सन 2013 मध्ये हाँकाँग, थायलंड, मलेशिया देशाच्या दौर्‍यासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. बॅटरी विक्रेते म्हणून व्यवसायात त्यांचा मोठा नावलौकिक होता. गेल्या आठ वर्षापासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. सांगळे माामांच्या निधनामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली. त्यांचा सावडण्याचा कार्यक्रम शनिवारी सकाळी होणार आहे. 
सांगळे मामा यांच्या पश्‍च्यात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. राजेश सांगळे व महेश सांगळे यांचे ते वडिल होत.

No comments