Breaking News

केजमध्ये तीस वर्षीय महिलेचा विनयभंग

गौतम बचुटे । केज
 केज येथे एका तीस वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २२ जुलै रोजी कर्ज येथील शिक्षक कॉलनीत राहून मजुरी करणारी एक तीस वर्षीय महिला ही आपल्या घरी जात असताना डॉ चाटे यांच्या दवाखान्याच्या पाठीमागे बाभळीच्या झाडाच्या आडोशाला रामधन महिपती चौरे यांनी तिला अडवून हाताला धरले आणि वाईट हेतूने तिच्या अंगाला स्पर्श करून तिचा विनयभंग केला तसेच तुझ्यावर प्रेम करतो आणि लग्न करतो असे म्हणाला व अशोक महिपती चाटे याने शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सदर पीडित महिलेच्या तक्रारी वरून केज पोलिस स्टेशनला रामधन महिपती चाटे व अशोक महिपती चौरे यांच्या विरोधात गु र नं २७५/२०२० भा दं वि ३५४, ३२३,५०४, ५०६ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मंगेश भोले हे पुढील तपास करीत आहेत.

No comments