Breaking News

कोरोनात सामान्या नंतर वकिलांवर उपससमारीची वेळ

बार कॉन्सिलकडे मदतीच वकिल संघाचं साकडं

गौतम बचुटे । केज 
एकीकडं कोरोना सोबत जगण्याचं तंत्र अवलंबल पाहिजे. असं सांगितलं जातं आहे. तसा प्रसार ही माध्यमातून केला जातोय. मात्र लॉकडाऊनमुळे सामान्यांची आर्थिक नाडी क्षीण झाली असताना वकिलांवर आणि त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आल्याने वकील संघानं बार कोन्सिलकडे किमान किराणा सामान वकिलांना लॉक डाऊन मध्ये देण्यात यावं. अशी मागणी केलीय. वकिलांवर अशी वेळ आली असेल तर देशातील जनतेचे काय विदारक चित्र असेल?सरकार करतंय तरी काय असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

केज कोर्टात वकिली करणारे वकील मंडळी आर्थिक अडचणीत सापडली असून त्यांचे कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी त्याना आर्थीक मदत किंवा किराणा सामान देण्याची मागणी केज वकील संघाने केली आहे.
केज वकील संघाचे अध्यक्ष अँड. एस. वाय. मुंडे यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र बार कॉन्सिलकडे मागणी केली आहे की, देशात कोरोनाच्या महामारीमुळे मार्च महिन्या पासून लॉक डाउन सुरू आहे. त्यामुळे कोर्टाचे कामकाज बंद आहेत. तसेच केज तालुका हा कायम दुष्काळग्रस्त आहे. येथील अनेक वकिलांकडे शाश्वत असे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून अनेकजण भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यामुळे कोर्टाचे कामकाज बंद असल्यामुळे वकिली व्यवसायही बंदच आहेत. काही अल्प प्रकरणातच कोर्ट सुरू असते. या  एकंदरीत समस्यांमुळे केज तालुक्यातील अनेक वकिल मंडळी आर्थिक अडचणीत आलेले आहेत. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक ओढाताण सुरू असून त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी महाराष्ट्र बार  कॉन्सिलने वकिलांना आर्थिक मदत करावी किंवा किराणा सामानाचे किट द्यावेत. अशी अँड मुंडे यांनी मागणी केली आहे. दरम्यान वकिलांची जर अशी अवस्था असेल तर सामान्यांचे काय हाल ! याची चर्चा होत आहे.

केज वकील संघाचे अध्यक्ष अँड. एस. वाय. मुंडे यांनी कॉन्सिलकडे अशाच प्रकारे केलेल्या मागणी नुसार दोन वेळा बार कॉन्सिलने त्यांना किराणा सामानाचे किट उपलब्ध करून दिलेले आहेत.


1 comment: