Breaking News

बजरंग सोनवणे यांच्यामुळे केज तालुक्यातील पंधरा शाळांना मिळाले एलसीडी आणि प्रोजेक्टर

गौतम बचुटे । केज
जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या प्रयत्नामुळे केज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पंधरा शाळांना एलसीडी व प्रोजेक्टर उपलब्ध झाले आहेत.


तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच ई लर्निंग आणि डिजिटल शिक्षणासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या प्रयत्नामुळे केज तालुक्यातील कानडी माळी, पिसेगाव, ढाकेफळ, सोनिजवळा, साळेगाव, सातेफळ, सुर्डी, उमरी, युसूफ वडगाव, आवसगाव, कानडी बदन, जवळबन, काळेगाव, घाटेवाडी आणि माळेगाव या केज तालुक्यातील पंधरा शाळांना एलसीडी आणि प्रोजेक्टर देण्यात आले आहेत यामुळे आता विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार असून खाजगी शाळांच्या तुलनेत आणि स्पर्धते जिल्हा परिषदेच्या शाळा आणि त्यात शिक्षण घेणारे स्पर्धेत मागे राहणार नाहीत.
शाळांना दिलेल्या या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण पसरले असून पालक व ग्रामस्थांतून बजरंग सोनवणे यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

No comments