Breaking News

नगरपरिषदेकडून हातावर पोट असणाऱ्या मासेविक्रेत्यांच्या जागेवर कारवाई

आपली कार्यक्षमता नाल्या, स्वच्छतेसाठी नगरपरिषदेने दाखवावी
गोरगरिबांवर अन्याय करण्याचे प्रकार थांबवा अन्यथा शिवसंग्राम स्वस्थ बसणार नाही - सुदर्शन धांडे 

बीड : येथील नगरपरिषद आवश्यक आहे त्या कामांकडे लक्ष न देता गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या जीवावर उठत आहे. नगर नाक्यापासून ते बंगल्याच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाजवळ असणाऱ्या मोकळ्या जागेत शहरातील मासेविक्रेते हे काही काळ मासे विकण्यासाठी बसत असतात. या ठिकाणी थोडाउंचवटा असावा म्हणून या मासेविक्रेत्यानी वटा बनवून घेतला होता मात्र नगरपरिषदेने हे वटेच काढून घेण्याची कारवाई केली असल्याने मासे विक्रीसाठी मच्छीमारांना अडचण निर्माण होत आहे. 

   संपूर्ण बीड शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे, ज्या त्या ठिकाणी कचरा, सांडपाणी वाहत आहे. नाल्या तशाच असून मान्सूनपूर्व कामे केली गेली नाहीत. हे सर्व सोडून नगरपरिषद मच्छिमारांच्या मासेविक्रीच्या जागेवर अतिक्रमणाचा हातोडा फिरवत आहे. 

नगरपरिषदेने या लोकांकडून कर वसुली केलेली आहे. दैनंदिन वसुली सुरु असते. या विक्री ठिकाणच्या बाजूची नाली नगरपरिषदेला काढता आलेली नाही अन या गोरगरीब लोकांच्या रोजीरोटीला थांबविण्याचे काम सुरु केले आहे. कोरोनामुळे लागलेला लॉकडाऊन आधीच या हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या मुळावर असताना नगर परिषदेचा सुलतानी कारभार यांना जगू देत नसले तर शिवसंग्राम स्वस्थ बसणार नाही असे शिवसंग्राम प्रदेश सरचिटणीस सुदर्शन धांडे यांनी म्हंटले आहे. 

No comments