जयभवानी सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे नियोजन करणार---अमरसिंह पंडित
जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या गळीत हंगामाचा रोलर पूजन समारंभ नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह. भ. प. शिवाजी महाराज, मच्छिंद्रनाथ गडाचे महंत ह. भ. प. जनार्धन महाराज यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी दि. १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे नियम पाळून संपन्न झाला.
या समारंभाला जयभवानी कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित, माजी चेअरमन जयसिंह पंडित, कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह संचालक सर्वश्री भाऊसाहेब नाटकर, साहेबराव पांढरे, श्रीहरी लेंडाळ, श्रीराम आरगडे, संदीपान दातखिळ, भास्करराव खराद, दिवाण जे. आर. आदी मान्यवर उपस्थित होते.
जयभवानी सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये कारखाना कार्यक्षेत्रात १०ते १२ लाख मे टन ऊस उपलब्ध असून ७ लाख गाळपाचे उदीष्ट आहे .कारखाना चालू करण्याच्या उद्देशाने कारखान्याने मशीनरी दुरूस्ती व इतर कामाची तयारी चालु केली असल्याचेही अमरसिंह पंडित यांनी सांगितले. यावेळी ह. भ. प. महंत शिवाजी महाराज आणि ह. भ. प. महंत जनार्धन महाराज यांनी शुभाशीर्वाद दिले.
जयभवानी कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एल. क्षिरसागर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जनरल मँनेजर दत्तात्रय टेकाळे, मुख्य अभियंता अशोक होके, शेतकी अधिकारी जे. के. शिंदे,चीफ अकौंटंट, एल. आर. नवले, सिव्हिल इंजिनियर कुलकर्णी व इतर अधिकारी, कर्मचारी, कामगार या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कोरानाच्या सोशल डीसटन्सचे पालन करण्यात आले तसेच सँनिटायजर व मास्क इत्यादी नियमाचे पालन करण्यात आले. या प्रसंगी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित कामगार व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
No comments