Breaking News

ना.अजितदादा यांच्यामुळे पांडुरंग पालखी अरणला येण्याची परंपरा अखंड राहिली - कल्याण आखाडे

बीड :  संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त प्रत्येक वर्षी पंढरपुरहून पांडुरंगाची पालखी अरणला येण्याची पूर्वापार पासुन चालत आलेलली परंपरा यावर्षी कोरोनामुळे खंडीत होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र ना. अजितदादा यांच्या पुढाकारामुळे श्री विठ्ठलाच्या पादुका अरणला आणण्यात येऊन  देव व भक्त भेटीची शेकडो वर्षांची परंपरा अखंड राहिली असल्याचे सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी म्हटले आहे.

पंढरपुरहून पांडुरंगाची पालखी अरणला येण्याची परंपरा फार मोठी व दोनशेहून अधिक वर्षांपासूनची आहे.म्हणून यात खंड न पडता परंपरा कायम राहावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे सावता परिषदेच्या वतीने मागणी करून कल्याण आखाडे यांनी सतत पाठपुरावा केला. ना. अजितदादा पवार यांनी या परंपरेची दखल घेऊन यात लक्ष घातले. त्यांच्या  पुढाकारामुळेच श्री विठ्ठलाच्या पादुका पंढरपुरहून अरणला आणण्यात आल्या व पांडुरंग परमात्मा व संत सावता महाराज यांच्या भेटीची परंपरा अखंड राहिली.त्याबद्दल ना.अजितदादा यांचे समाज बांधव व वारकरी संप्रदयाच्या वतीने कल्याण आखाडे यांनी जाहीर आभार मानले आहेत.

No comments