Breaking News

आजपासून परळीशहर १२ जुलै पर्यंत लॉकडाऊन

नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई - जिल्हाधिकारी यांचे आदेश

परळी : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया मधील पाच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने इतर भागामध्ये कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी आजपासून परळी शहर दि.१२ जुलै रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले असून शहरात संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली. तसे आदेश  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मध्यरात्री दिले आहेत.
शहरातील बँक ऑफ इंडियाचे एकूण पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं शहरात प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. बँकेत शहरातील तसेच परिसरातील नागरीकांची ये-जा झाल्यानं परळी शहरातून इतर भागामध्ये कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी संचार बंदी लागू करण्यात येऊन शहर सात दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दरम्यान या काळात कोणाला ही शहराबाहेर जाता किंवा कोणालाही शहरात येता येणार नसून नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसे निर्देश जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिले आहेत.

बंद दरम्यान यांना असेल मुभा..
जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सेवा व माध्यमांना परवानगी देण्यात आली असून अत्यावश्यक सेवांमधील शासकीय कार्यालये वगळता (महसूल, पोलीस, ग्रामविकास, नगरविकास. कृषी व आरोग्य ) परळी शहरातील सर्व आस्थापना, बँका, शासकीय व खाजगी आस्थापना इत्यादी बंद राहतील, असे जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. 

No comments