Breaking News

केजमध्ये दुचाकीस्वाराला अज्ञात चोरट्यांनी लुटले!

मोबाईलसह सोन्याचे दागिने रोख रक्कम असा 44 हजार रुपयांचा ऐवज केला लंपास
गौतम बचुटे । केज 
केज येथे कानडी रोडवर रात्रीच्या वेळी एका इंटरनेट कॅफे चालकाची मोटार सायकल अडवून त्याचा मोबाईल, अंगठी, कानातील बाळी व जवळील रोख रक्कम काढून घेतल्याची घटना घडली असून पोलीस गुन्हेगाराच्या मागावर आहेत.

केज येथे दि. ७ जुलै रोजी हे इंटरनेट कॅफे चालक रात्री१०:३० ते ११:०० दरम्यान विजय राजाभाऊ कदम व त्यांचे वडील हे मोटार सायकल वरून कानडी रोडने जात असताना ते सोनारवाडी पुलाजवळ आले असता; निखिल मस्के त्याचा बबलू नावाचा एक साथीदार व अन्य अनोखी एकजण अशा तिघांनी त्यांना अडवून त्याच्या जवळील ओप्पो कंपनीचा एक मोबाईल, हातातील सोन्याची अंगठी, कानातील सोन्याची बाळी व खिशातील रोख पाच हजार रु. असा एकूण चौरेचाळीस हजार सातशे रु किंमतीचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी विजय राजाभाऊ कदम यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला निखिल मस्के, बबलू व अन्य एक अनोळखी यांच्या विरोधात गु. र. नं. २६४/२०२० भा. दं. वि. ३९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.
गुन्हा दाखल होताच तपासी पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे गुन्हेगाराच्या मागावर असून गुन्ह्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या मुद्देमाल हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या रोडवर अनेक वेळा असे प्रकार घडलेले आहेत.

No comments