Breaking News

कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होऊनही बँका पीककर्ज देईनात


शिवसंग्राम युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटेंची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार 

बीड :-  महाविकास आघाडीने केलेली कर्जमाफी हि काही शेतकऱ्यांसाठी फसवी ठरत असून कर्जमाफी यादीत नाव, त्यानंतर आधार प्रमाणीकरण पावती मिळून देखील ते कर्जमाफ झाले नसल्याची सदर बँक व्यवस्थापकडून जाहीर केले जाणे असे प्रकार घडत आहेत. बीड तालुक्यातील रामगाव येथील प्रवीण व सुनील देवडकर या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीत नाव आहे, त्यांनी आधार प्रमाणीकरण केलेली पावती आहे मात्र युनिअन बँक शाखेचे मॅनेजर श्री घोडके यांच्यामते हे कर्ज माफ झालेले नसून त्यांना नवीन पीककर्ज देता येणार नसल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे.
 कर्जमाफीच्या यादीत नाव अन आधार प्रमाणीकरण होत असेल अन बँकाकडून माफीचा मिळाली नाही असे उत्तर येत असेल तर हि कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी फसवीच ठरत आहे असा आरोप करत शिवसंग्राम युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या विषयात लक्ष घालून न्याय देण्याची मागणी केलेली आहे. असे हे प्रकार सातत्याने उजेडात येत असून शेतकऱ्यांना नेमके यात करावे हे सुचत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत उपाययोजना करणे आवश्यक आहे जेणेकरून पात्र शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ तरी घेता येईल असे आवाहन देखील रामहरी मेटे यांच्याकडून करण्यात आले आहे.  

No comments