Breaking News

भाजपाने केजच्या महावितरण कार्यालयासमोर केली वीज बिलाची होळी


गौतम बचुटे । केज
येथील वीज बिल माफीसाठी वितरण कार्यालयाच्या समोर वीज बिलाची होळी करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

 भाजपाचे जेष्ठ नेते आणि आमदार नमिताताई मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्त्वाखाली व्यापारी, शेतकरी, घरगुती, मीटरचे लॉकडाऊन काळात देण्यात आलेल्या अवास्तव विज बिल माफ करावे. या प्रमुख मागणीसाठी केज येथील महावितरण कार्यालया समोर केज भाजपाच्या वतीने हलगी वाजवून वीज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी  उपस्थित तालुकाध्यक्ष भगवान केदार, उपसभापती ऋषीकेश आडसकर साहेब, जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे, रमाकांत मुंडे, विष्णू घुले, डॉ. वासुदेव नेहरकर, महादेव सूर्यवंशी, सुरेंद्र तपसे, दत्ता धस, शरद इंगळे, राहुल गदळे, शेषेराव कसबे, बप्पा डोंगरे, अंगद मुंळे, रामराजे तांबडे, सोनू सावंत, चंदू मिसाळ, शमशेर तांबोळी, विक्रम डोईफोडे, युवराज दातार, घुले यांच्यासह अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments