Breaking News

मागण्या पुर्ण न झाल्यास लॉकडाऊन नंतर जन आंदोलन उभारणार- रमेश पोकळे


बीड :  भारतीय जनता पार्टी नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या सुचनेवरून व बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश कार्यकारणी सदस्य रमेशभाऊ पोकळे व भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, छोटे व्यवसायीक व घरगुती वीज ग्राहक यांना प्राप्त झालेल्या वाढीव वीज बिल माफ करण्यासाठी बीड भारतीय जनता पार्टीच्या वतीने हालगी बजाओ आंदोलन सोमवारी ( दि.२०) करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीच्या या आंदोलनाची दखल घेवून महामंडळाने मागण्या पुर्ण न केल्यास  लॉकडाऊन नंतर जिल्हाभरात भव्य जनआंदोलन उभारण्यात येईल असा ईशारा प्रदेश कार्यसमितीचे सदस्य रमेश पोकळे यांनी दिला.
महाराष्ट्रात सर्वत्र कोराना साथीचा संसर्ग वाढत असतांना छोटे व्यवसायीक, व्यापारी यांचे व्यवसाय लॉकडाऊनमुळे बंद असतांना महावितरण कंपनीने भरमसाठ वीज बिलाची आकारणी केलेली आहे. महावितरण कंपनीचे हे धोरण व्यापारी, शेतकरी, व्यावसायीक व सामान्य नागरीकांवर अन्याय करणारे असुन भारतीय जनता पार्टीच्या वतीने या वाढीव वीज बिलाची होळी महावितरणच्या अधिक्षक अभियंता यांच्या विभागीय कार्यालयासमोर करण्यात आली.
या प्रसंगी मा.अधिक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनामध्ये बीड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात लॉकडाऊन कालावधीत मिटर रेडिंग न घेता आकारण्यात आलेली अवाजवी वीज बिल माफ करावे, मिटर बंद असतांनाही आजवर आकारण्यात आलेले विद्युत बिल पुर्णतः माफ करण्यात यावे.बीपीएस धारक वीज ग्राहकांचे घरगुती मिटर काढुन नेले असतांनादेखील आकारलेली बिले माफ करावीत. नादुरूस्त असलेले विद्युत ट्रान्सफार्मर तातडीने बदलुन देण्यात यावेत. दोन शेतकरी एक ट्रान्सफार्मर या योजनेद्वारे शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना तातडीने विद्युत जोडणी देण्यात यावी. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे होणार्‍या दुर्घटनेत विजेचा शॉक लागुल मृत्यूमूखी पडलेल्या कुटूंबीयांच्या वारसदारांना तातडीने 10 लाख रूपया पर्यंतची मदत करण्यात यावी. 
जिल्हाभरात वाकलेले पोल, खाली आलेल्या तारा दूरूस्त करून नागरीकांच्या जिवाला निर्माण झालेला धोका दुर करावा अशा मागण्यांचे निवेदन मा.अधिक्षक अभियंता यांना देण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस सुभाष धस, जि.प.सदस्य रामराव खेडकर,अशोक लोढा, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गलधर, चंद्रकांत फड, राजेंद्रअण्णा बांगर,डॉ.देविदास नागरगोजे, विजयकुमार पालसिंगणकर, सलिम जहाँगीर, नवनाथ शिराळे, प्रविणजी पवार, गोरख शिंदे, प्रकाश खेडकर, संदिप उबाळे, भगिरथ बियाणी, विलास बामणे, दत्ता परळकर, सुनिल मिसाळ, प्रा. सचिन उबाळे, भुषण पवार, बालाजी पवार, फारूक शेख, मनोज ठानगे, भगिरथ बियाणी,अमोल वडतीले, सुशांत घोळवे, महिला आघाडीच्या अ‍ॅड. संगिता धसे, संध्या राजपुत, छाया मिसाळ, लताताई मस्के, हानुमान मुळीक, हारीष खाडे, तुळसीदास महाराज शिंदे, शांतीनाथ डोरले, मुंकुंद फाटक, विलास सातपुते आदी भाजपाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य नागरीक उपस्थित होते.

No comments