Breaking News

माजलगाव शहरातील विविध माध्यमिक विद्यालयाने राखली यशाची परंपरा

माजलगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत येथील विविध माध्यमिक विद्यालयाने कला- विज्ञान- वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून  विद्यालयाची यशाची परंपरा राखली आहे.


जवाहर उच्च माध्यमिक विद्यालय
केसापुरी वसाहत येथील जवाहर उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला शाखेचा निकाल ७५.९२ टक्के लागला असून दाभाडे मोहिनी उत्तमराव ८१.३८, कांबळे दिपाली दशरथ ७८.३०, कोरडे सुनिता अनिलराव ७७.३८, पठाण आयशा अन्वर ७५.८४ असे गुण घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थीनींनी आपली यशस्वी परंपरा कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना एस.बी.सांगळे, एस.जी.राठोड, एस. डी. लऊळकर, एन. बी. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नवविकास मंडळाचे अध्यक्ष ॲड.एस.आर.शर्मा, कार्यवाह आ. डी. के. देशमुख, शालेय समितीचे अध्यक्ष ॲड. आर. डी. भिलेगावकर, संचालक ॲड. एस. बी. मुळी, ॲड. ए. एम. मोगरेकर, आर. बी. देशमुख, जी. एल. जोशी, प्राचार्य अभिमन्यु इबिते, पर्यवेक्षक के. एल. मोताळे यांनी अभिनंदन केले.
सुंदरराव सोळंके महाविद्यालय
विज्ञान शाखेत  88.57 %,  कला शाखेत 61.84%,
 वाणिज्य शाखेत 88.33%.  व्यवसायिक अभ्यासक्रम 78.40 % निकाल लागला असून महाविद्यालयाचा शाखानिहाय निकला मध्ये विज्ञान शाखेत प्रथमेश पाटील (87.23%). प्रथम , सृष्टी बाराहाते (83.69%) द्वितीय, दत्ता कोरडे व राजकुमार रामदासी (80.76%) तृतीय. कला शाखेमध्ये वैष्णवी शिंनगारे (82.30%) प्रथम , स्वाती तौर (79.53%) द्वितीय तर अफरोज शेख (79.07%)तृतीय आणि वाणिज्य शाखे मध्ये साक्षी जाधव (90.76%) प्रथम, अविनाश सोळंके (82.76%) द्वितीय, वैष्णवी सोनवणे (80.15%) तृतीय क्रमांक पटकावुन  यश संपादन केले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे म. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाशदादा सोळंके, सरचिटणीस आ. सतिश चव्हाण, माजी आ. राधाकृष्ण होके पाटील,ऍड भानुदासराव डक,सत्यप्रकाश रुद्रवार, डॉ बी.एल. चव्हाण,प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, उपप्राचार्य पवन शिंदे, उपप्राचार्य प्रकाश गवते, प्रबंधक प्रशांत चव्हाण यांनी अभिनंदन केले.
श्री सिद्धेश्वर महाविद्यालय
 महाविद्यालयाचा इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत एकूण सर्वसाधारण निकाल 90 टक्के लागला. महाविद्यालयातील एकूण 570 परीक्षार्थी पैकी 307 प्रथम श्रेणीत 30 विद्यार्थी विशेष प्राविण्य,172 जण द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
महाविद्यालयाच्या शाखानिहाय निकालानुसार विज्ञान शाखेचा सर्वाधिक 98.58%,वाणिज्य शाखा 95.19% आणि कला शाखा 81.19 %   आहे.सर्वाधिक गुण प्राप्त केलेले शाखानिहाय विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत-
विज्ञान शाखा -1) कु. निकीता रमेश पायघन 82.30% 2) निकिता राधाकिसन डोणे 80.30% 3) आरती संजय नरवटे- 78.30% वाणिज्य शाखा- 1) प्रियंका  भीमराव कदम- 89.84% 2)ऋतुजा परमेश्वर सोळंके -88.61% 3)देवानंद प्रल्हाद गाडे- 87.53% कला शाखा -1) ज्ञानेश्वर कारभारी नरवटे-79.84% 2)शुभांगी सुखदेव आदमाने- 79.23% 3) क्रांती आत्माराम भूतकर- 76.46% .
महाविद्यालयाच्या घवघवीत यशाबद्दल भा.शि.प्र.संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर,उपाध्यक्ष राधेश्यामजी लोहिया, कार्यवाह नितीनराव शेटे,सहकार्यवाह प्रा.चंद्रकांत मुळे, डॉ.हेमंत वैद्य,केंद्रीय सदस्य तथा संकुलाचे पालक सुनील लोढा ,स्थानिक पदाधिकारी प्रकाश दुगड,अमरनाथ खुर्पे,अभय कोकड, प्रेमकिशोर मानधने,विश्वास जोशी,जगदीश साखरे,तेजस महाजन ,प्राचार्य डॉ.भालचंद्र कराड, उपप्राचार्य प्रा. संतोष लिंबकर, डॉ.गजानन होन्ना, प्रा. युवराज मुळे यांनी विदयार्थी आणि प्राध्यापक वृंदांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


No comments