Breaking News

वैष्णवी गोरे खुन प्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा झाली पाहिजे - कल्याण आखाडे


बीड : वैष्णवी गोरे या नवविवाहित तरुणीचा धारदार शस्त्राचे वार करून अत्यंत अमानुष व निर्दयीपणे खुन करणाऱ्या क्रूरकर्मा आरोपीस फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून याप्रकरणी वाचा फोडण्यासाठी राज्यभर व्यापक प्रमाणावर आवाज उठविणार असल्याचे सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी म्हटले आहे.

           मंठा जि. जालना येथील वैष्णवी गोरे ही नवविवाहिता लग्नानंतर येती-जाती साठी माहेरी आली असता शेख अल्ताफ या विकृत व गुंड प्रवृत्तीच्या आरोपीने एकतर्फी प्रेमातुन भर दिवसा-भर चौकात क्रुरपणे तिचा खुन केला. सदर घटना ही मानवतेला काळीमा फासणारी व संतापजनक आहे. मात्र आरोपी आत्महत्या करण्याचे नाटक करून पळवाट शोधण्याच्या प्रयत्नांत आहे. यासाठी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व गृहमंत्री अनिलजी देशमुख यांच्याकडे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, सरकारी वकील म्हणुन अॅड उज्ज्वल निकम यांची नेमणुक करावी तसेच प्रकरण गंभीर असल्यामुळे अंडर ट्रायल चालवावे अशी मागणी करणार असल्याचे सांगून याप्रकरणी राज्य महिला आयोगाने तातडीने लक्ष घालण्याची मागणीही श्री.आखाडे यांनी केली आहे.

No comments