Breaking News

सोयाबीन मूग व उडीद पिकास युरियाच्या दुसऱ्या मात्रेची आवश्यकता नाही- कृषी विकास अधिकारी साळवे

बीड : सोयाबीन, मूग ,उडीद पिक द्विदल वर्गीय असल्यामुळे या पिकांच्या मुळाशी नैसर्गिक गाठी असतात. या गाठी द्वारे हवेतील उपलब्ध असलेले नत्र शोषून घेऊन पिकास उपलब्ध होते. त्यामुळे या पिकांना युरियाची दुसरी मात्रा देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी युरियाचा वारेमाप वापर करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस. एम. साळवे यांनी केले आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात एप्रिल पासून आज अखेर युरियाचा 31851 मेट्रिक टन,डीएपी 15542 मेट्रिक टन , एम ओ पी 19 14 मेट्रिक टन, संयुक्त खते 52 552 मेट्रिक टन, एस एस पी 52 43 मेट्रिक टन खताचा पुरवठा झालेला आहे. खताच्या विक्री अहवालानुसार जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा व विशेषत युरियाचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन, मूग ,उडीद पिक द्विदल वर्गीय असल्यामुळे या पिकांच्या मुळाशी नैसर्गिक गाठी असतात. या गाठी द्वारे हवेतील उपलब्ध असलेले नत्र शोषून घेऊन पिकास उपलब्ध होते. त्यामुळे या पिकांना युरियाची दुसरी मात्रा देण्याची आवश्यकता नाही. मात्र जिल्ह्यातील शेतकरी पेरणीनंतर 30 ते 40 दिवसांनी परत युरिया देतात. ही शास्त्रीयदृष्ट्या चुकीची पद्धत असून त्यामुळे पिकांची केवळ कायिक वाढ मोठ्या प्रमाणात होते. परंतु फुले व फळधारणा कमी होऊन व मुळावरील गाठी निष्क्रिय होऊन उत्पादनात घट येते. त्याचप्रमाणे नैसर्गिक नत्र उपलब्ध होत असूनही परत नत्रयुक्त खते दिल्याने खतावरील खर्च वाढतो. तसेच हिरवेगार पीक किडींना आकर्षित करून किडींचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाचा खंड पडल्यावर अशा परिस्थितीत पिकावर ताण पडतो. तरी शेतकरी बंधुंनी नत्र स्फुरद व पालाश खताचा संतुलित व जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशींच्या मात्रे  नुसार खते देण्यात यावी. तसेच पिकांना कुठले खत फेकून देऊ नये. खत पिकाच्या मुळांची मातीच्या आड डवर्याच्या मागे घ्यावे. खत फेकून दिल्यास हवेमुळे ते उडून जाते व पाऊस पडल्यानंतर ते वाहून जाते. त्याचा फायदा पिकाला होत नाही. शिवाय जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खते उपलब्ध आहेत. त्यामुळे खते खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावर अनावश्यक गर्दी करू नये. त्याचप्रमाणे खताचा साठा करू नये ठेवू नये. सद्यस्थितीत covid-19 च्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रावर सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच शेतकऱ्यांनी युरिया खताचा वारेमाप वापर करू नये, असे आवाहन कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद बीड श्री. एस एम साळवे यांनी केले आहे.

No comments