Breaking News

केजमध्ये खासगी नोकरी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार

लग्नाचं आमिष दाखवून केला अत्याचार; गुन्हा दाखल होताच नराधमाला पोलिसांनी केली अटक 
गौतम बचुटे । केज 
खासगी नोकरी करणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून गावातीलच एका नराधमाने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना केज तालुक्यातील तांबवा येथे मंगळवारी (दि.१४) उघडकीस आली. दरम्यान आपल्या या कृत्याबद्दल कोणाला काही सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी  पीडित तरुणीला हैवानाने दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्या हैवानाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील तांबवा येथील एका हैवानाची गावातीलचं खासगी नोकरी करणाऱ्या 24 वर्षीय तरुणीवर वासनांध नजर पडली. तिला लग्नाचे आमिष दाखवून त्यानं स्वतःच्या घरात त्या तरुणीवर दि. ९ जुलै रोजी बलात्कार केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर तुला जीव मारून टाकीन अशी धमकी दिल्याने भयभीत झालेल्या त्या तरुणीवर त्याने वारंवार बलात्कार केला. अखेर मात्रत्या तरुणीने मंगळवारी (दि.१४) केज पोलिस ठाणे गाठून आपल्यावरील आपबीती सांगून, त्या नराधमाविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला.  गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी तात्काळ नराधमाला अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे करत आहेत. 

No comments