Breaking News

बायकोला मारहाण करून नवरा दागिने घेवून झाला पसार

पोटगीसाठी होता वाद; नवऱ्यासह दिरा विरुद्ध गुन्हा दाखल
पीडित महिलेची अतिरिक्त पोलीस अधीक्षक भोर यांनी घेतली भेट
सदर घटना ही गंभीर स्वरूपाची असल्याने माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर आणि पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी घटनास्थळावर जाऊन माहिती घेतली.
गौतम बचुटे । केज
तालुक्यातील नारेवाडी येथे पोटगीचा दावा मागे घे म्हणून पीडित महिला पती आणि दोन दिरांनी त्या महिलेच्या घरात घुसन मारहाण केली आणि एक लाख रु. किमतीचे दागिने चोरून नेल्याचे घटना घडली आहे. सदर घटना माहीती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचे अवलोकन केले.
या बाबतची माहिती अशी की, नारेवाडी येथील तेलीवस्तीवर दि. २ जुलै रोजी रात्री दीड वा. पद्मिनबाई आत्माराम सानप ही महिला तिच्या आई सोबत राहत असताना आत्माराम साहेबराव सानप त्याचे भाऊ जयराम साहेबराव सानप आणि आसाराम साहेबराव सानप यांनी संगनमत करून व ओळखीचा फायदा घेऊन घरात शिरले. त्यांनी पद्मिनबाई सानप हिने साहेबराव सानप यांच्या विरोधात हुंडाबळी आणि न्यायालयात चालू असलेला पोटगीचा दावा मागे घेण्याच्या उद्देशाने फिर्यादी पद्मिनबाई सानप व तिची आई अनुसया उगलमूगले यांना डोक्यात मारहाण केली. तसेच अनुसया उगलमूगले हिच्या गळ्यातील मनीमंगळसूत्र आणि पुतळ्याची माळ असे तीन तोळे सोन्याचे एक लाख पाच हजार रु. किंमतीचे दागिने तोडून नेले. जखमी पद्मिनबाई सानप हिच्यावर बीड येथे उपचार घेत आहे. या प्रकरणी पद्मिनबाई सानप हिच्या फिर्यादी वरून आत्माराम साहेबराव सानप व त्याचे भाऊ जयराम साहेबराव सानप आणि आसाराम साहेबराव सानप यांच्या विरुद्ध गु. र. नं. २५२/२०२० भा. दं. वि. ४५२, ३२७, ३२४, ३२३ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे पुढील तपास करीत आहेत.

No comments