Breaking News

पोलीस उपनिरीक्षक सोनवणे सेवानिवृत्त


पोलीस उपनिरीक्षक सोनवणे याना केज पोलीसांच्या वतीने निरोप
गौतम बचुटे । केज
येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील वाचक पोलीस उपनिरीक्षक भास्कर सोनवणे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांना केज पोलीस स्टेशनच्या वतीने निरोप देण्यात आला.

केज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपअधीक्षक यांचे वाचक म्हणून कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक भास्कर सोनवणे हे त्यांच्या विहित वयोमाना नुसार दि.३१ जून रोजी सेवानिवृत झाले आहेत. या सेवा निवृत्ती बद्दल त्यांना केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस निरीक्षक श्रीराम काळे आणि पत्रकार गौतम बचुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने भास्कर सोनवणे यांचा शाल पुष्पगुच्छ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सहाय्यक पोलीस  निरीक्षक संतोष मिसळे, दादासाहेब सिद्धे, उमाशंकर शिंदे, महादेव गुजर, शिवाजी शिनगारे आणि गौतम बचुटे यांनी सोनवणे साहेब हे अत्यंत प्रामाणिक आणि कर्त्यव्य कठोर असल्याचे सांगितले. तसेच त्यांना पुढील भावी आयुष्य हे सुख व समृद्धीचे जावो. अशी अपेक्षा व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाला प्रेमचंद वंजारे, मधुकर रोडे, प्रतापसिंग सेंगर, मंगेश भोले, अशोक नामदास, अतुल जोगदंड, अमोल गायकवाड, अशोक गवळी, अमर घुले, शेख मतीन, श्रीराम चेवले, रविंद्र शिंदे मेजर, भास्कर शिरसट, बाळू सोनवणे, सतीश बनसोडे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष मिसळे यांनी केले.

चौकट :-

" एकोण चाळीस वर्षाच्या सेवेत वर्दीला डाग लागू दिला नाही " (पोउनि भास्कर सोनवणे ) :-

या निरोपाला उत्तर देताना सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भास्कर सोनवणे म्हणाले की, मी पोलीस खात्यात ३९ वर्ष अशी प्रदीर्घ सेवा केली अनेक अधिकारी यांच्या सोबत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत असताना सचोटी प्रामाणिकपणा व वक्तशीरपणा यामुळे वर्दीला कधी डाग लागू दिला नाही.  हीच माझ्या आयुष्याची खरी कमाई आहे. अशी भावना भास्कर सोनवणे यांनी व्यक्त केली.

No comments