Breaking News

केजच्या वाटमारी प्रकरणातील आटोपी आत्ता न्यायालयीन कोठडीत

 सपोनी संतोष मिसळे
गौतम बचुटे । केज
शहरातील कानडी रोडवर रात्रीच्या वेळी एका इंटरनेट कॅफे चालकाची मोटार सायकल अडवून  वाटमारी प्रकरणातील तिन्ही आरोपीना त्यांची पाच दिवसाची पोलीस कोठडी संपताच आता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

केज येथे दि. ७ जुलै रोजी हे इंटरनेट कॅफे चालक रात्री१०:३० ते ११:०० दरम्यान विजय राजाभाऊ कदम व त्यांचे वडील हे मोटार सायकल वरून कानडी रोडने जात असताना ते सोनारवाडी पुलाजवळ आले असता; तिघांनी त्यांना अडवून त्याच्या जवळील ओप्पो कंपनीचा एक मोबाईल, हातातील सोन्याची अंगठी, कानातील सोन्याची बाळी व खिशातील रोख पाच हजार रु. असा एकूण ४४ हजार सातशे रु किंमतीचा ऐवज चोरून नेला होता.

या प्रकरणी विजय राजाभाऊ कदम यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला निखिल मस्के, बबलू व अन्य एक अनोळखी यांच्या विरोधात गु. र. नं. २६४/२०२० भा. दं. वि. ३९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि त्यांचे सहकारी सपोउनि महादेव गुजर, मतीन शेख, अशोक नामदास, जिवन करवंदे, हनुमंत चादर, अशोक गवळी यांनी धडाकेबाज कार्यवाही करून निखिल उर्फ दादया राजाभाऊ मस्के आणि आकाश बापू लोंढे आणि विशाल उर्फ बबलू सुहास सरवदे या तिघांनाही ताब्यात घेतले होते. दि. १३ जुलै पर्यंत त्यांना पाच दिवसाची पोलीस कोथंडी मिळाली होती. त्यांची पोलीस कोठडी संपताच त्यांना आता केज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

No comments