Breaking News

आरणगावमध्ये कृषि दिन उत्साहात


गौतम बचुटे । केज 

 महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मदिना निमित्त केज तालुक्यातील आरणगाव येथे नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प योजना अंतर्गत कृषी दिन साजरा करण्यात आला.

माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म दिनाच्या निमित्त १ जुलै ते ७  जुलै हा कालावधी कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या निमित्त महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँकेच्या अर्थ साहाय्याने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पा अंतर्गत बुधवार दि. २ जुलै रोजी आरणगाव ता. केज येथे मंडळ कृषि अधिकारीही अंबोरे, उद्यान पंडित रमेश सिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत समूह सहाय्यक कमलाकर राऊत यांनी व कृषि सहाय्यक किशोर फरकांडे यांनी शेती शाळा आयोजित केली करून कृषी दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी कमलाकर राऊत यांनी खरीप पिकांची आंतर मशागत, एकात्मिक कीड व्यवस्थापन व नियंत्रण, योग्य औषधींची योग्य मात्रेत फवारणी आणि विविध योजना यांची माहिती दिली. तसेच कृषी विभागाचे अधिकारी यांचे सल्ला व मार्गदर्शन शेतकऱ्यांनी घ्यावे. असे सांगितले.
या कार्यक्रमाला मंडळ कृषि अधिकार  विकास अंभोरे, कृषि सहाय्यक किशोर फरकांडे, उद्यान पंडित रमेश सिरसाट, मधुकर सिरसाट, शामसुंदर सिरसाट, अमोल राऊत, भांगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

No comments