Breaking News

बांध खोदून शेत रस्ता अडविला : शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार

केज तालुक्यात रस्ता आणि बांधाच्या कारणावरुन मारामाऱ्या आणि आपसात तणाव निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडत असून प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे.
गौतम बचुटे । केज
 तालुक्यातील साळेगाव शिवारात शेत रस्ता खोदून रस्ता अडविल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांनी शेतात पिकविलेला माल विक्रीसाठी बाजारात न्यायला अडचण येत असल्यामुळे रस्ता खुला करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, साळेगाव ता. केज शिवारातील गट नं. २९ व २७ शेतकरी सीमा मोहन धपाटे, शेख अतिक हमीद आणि प्रदीप मोहनराव कोठुळे यांनी दि. ८ जुलै रोजी तहसीलदार केज यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, सदर गट नंबर/सर्व्हे नंबर मधील बांधावरून जाणार जुना व पूर्वपार रस्ता होता. याच रस्त्या वरून सर्व शेतकऱ्यांचा वावर होता. परंतु या शेता लगतचे शेजारी शेतकरी एच. पी. देशमुख यांनी जेसीबी मशिनने रस्ता खोदून नंबर बांधाच्या मधोमध पाईपलाईन करून रस्ता बंद केला आहे. त्यांनी रस्ता बंद केल्यामुळे शेतात जाण्या-येण्यास आणि शेतात पिकविलेला भाजीपाला बाजारात घेऊन जाण्यास अडथळा येत आहे. या बाबत शेतकऱ्यांनी देशमुख यांना विचारले असता; ते धमकी देऊन अरेरावी करीत असल्याचाही उल्लेख निवेदनात असून या शेतरस्त्या वाचून होणारी गैरसोय टाळण्याची मागणी करून रस्ता खुला करून न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

No comments