Breaking News

धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त ४५ रोपांचे वाटप; राष्ट्रवादी महिला आघाडीचा उपक्रम

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने तालुक्यातील नवगण राजुरी येथे शनिवारी (दि.११) ४५ रोपांचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. धनंजय मुंडे यांच्या ४५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. त्यानुसार तालुक्यातील नवगण राजुरी येथे शनिवारी ४५ रोपांचे वाटप करण्यात आले. यातून वृक्षारोपण व पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

४५ मास्कचे वाटप

कमल निंबाळकर यांच्या वतीने साक्षाळपिंप्री (ता. बीड) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ४५ जणांना मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले. कोरोनाच्या संकटात कमल निंबाळकर यांनी मोफत अन्नधान्य, किराणा तसेच अन्नछत्र असे उपक्रम राबविले होते. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्तही त्यांनी मास्क, सॅनिटायझरचे वाटप करुन गरजूंना दिलासा दिला.

No comments